आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 16 वर्षांच्या ताहिरवर जडला होता आयुष्यमानचा जीव, पाहा Life In Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- पत्नी ताहिर कश्यपसह आयुष्यमान खुराणा)
अभिनेता बनवण्यापूर्वी आयुष्यमान खुराणाची एक टीव्ही अँकर म्हणून ओळख होती. आज आयुष्यमना त्याचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. 14 सप्टेबर 1984 रोजी पंजाब चंदीगडमध्ये जन्मलेला आयुष्यमान आज बॉलिवूड अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचे कुटुंबीय आहजी पंजाबमध्ये राहत आहे. कामातून वेळ मिळाला, की तो कुटुंबीयांकडे जातो.
आयुष्यमानचे शिक्षण चंदीगडमध्ये झाले. शालेय शिक्षणानंतर त्याने इंग्लिश लिटरेचरमधून पदवी शिक्षण आणि मास कम्युनिकेशनमधून पदवुत्तर शिक्षण पूर्ण केले. ग्लॅमरस इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी त्याने स्थानीक थिएटरमध्ये 5 वर्षांपर्यंत काम केले होते. यावेळी त्याची भेट ताहिरशी झाली. आयुष्यमानच्या सांगण्यानुसार, ताहिर त्याच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची तरुणी आहे.
एमटीव्ही रोडीजमधून मिळाली ओळख
आयुष्यमानने त्याच्या करिअरला एक अँकर म्हणून सुरुवात केली. परंतु त्याला लोकप्रियता आणि ओळख 2004मध्ये आलेल्या एमटीव्ही रोडीजच्या दुस-या पर्वामधून मिळाली. त्यापूर्वी तो दिल्लीमध्ये बिग एफएममध्ये आरजे होता. रेडिओनंतर आयुष्यमान एमटीव्हीच्या अनेक शोमध्ये व्हिडिओ जॉकी बनला आणि लवकरच टीव्हीवर होस्ट म्हणूनसुध्दा झळकला.
विकी डोनरमधून केली बॉलिवूडमध्ये एंट्री
2012मध्ये 'विक्की डोनर' सिनेमामधून त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केलीय स्पर्म डोनेशनवर आधारित या सिनेमातून त्याला बरीच पसंती मिळाली. सिनेमात त्याने एक गाणेदेखील गायले आहे. या सिनेमासाठी त्याला फिल्म फेअर अवॉर्ड फॉर बेस्ट मेल डेब्यू आणि गाण्यासाठी फिल्म फेअर अवॉर्ड फॉर बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर हे दोन पुरस्कार त्याला मिळाले आहेत.
बालपणीच्या मैत्रीणीला बनवले जोडीदार
आयुष्यमानने बालपणीची मैत्रीण ताहिर कश्यपला जिवनसाथी म्हणून निवडले. ताहिर 16 वर्षांची असताना आयुष्यमानशी तिच्याशी भेट झाली होती. दोघांचे कुटुंबीय एकमेकांना ओळखतात. जवळपास 12 वर्षांच्या मैत्रीणाला त्यांनी 2011मध्ये लग्नात रुपांतरीत केले. दोघांला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अभिनेत्या पत्नी असूनदेखील ताहिर लाइमलाइटपासून दूर आहे. ती व्यवसायाने लेखिका आहे.
फिल्मी करिअर- विक्की डोनर (2012), नौटंकी साला (2013), बेवकूफिया (2014)
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिर आणि बॉलिवूड स्टार्ससह काही छायाचित्रे...