आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Birthday Special : Childhood Pics Of Karishma Kapoor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'Day: 40 वर्षांची झाली 'लोलो', पाहा करिश्माचे बालपणीचे 10 PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील रणधीर कपूरसह करिश्मा कपूर
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आज (25 जून) 40 वर्षांची झाली आहे. 25 जून 1947 रोजी तिचा जन्म मुंबईमध्ये झाला. ती शो मॅन नावाने प्रसिध्द बॉलिवूड अभिनेते राजकपूर यांची नात आहे. तिचे वडील रणधीर कपूर आणि आई बबिता यांनीसुध्दा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे. करिश्माला तिचे मित्र-मैत्रीणी आणि कुटुंबीय प्रेमाने 'लोलो' नावाने म्हणतात.
वयाच्या 17व्या वर्षी करिश्माने 1991मध्ये दिग्दर्शक के. मुरलीमोहन राव यांच्या 'प्रेम कैदी'मधून बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. 1996च्या 'राजा हिंदुस्तानी' या सुपरहिट सिनेमासाठी तिला पहिल्यांदा फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेत्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
90च्या दशकात 'जिगर', 'राजा बाबू', 'सुहाग', 'कुली नं. 1', 'गोपी किशन', 'साजन चले ससुराल' आणि 'जीत'सारख्या अनेक सुपरस्टार सिनेमे करिश्माने बॉलिवूडला दिले. त्यानंतर तिने 2003मध्ये उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. दोघांना मुलगी समयरा आणि मुलगा कियान ही दोन मुले आहे. करिश्मा आणि संजय यांनी यावर्षी घटस्फोट घेतला आहे.
दिर्घकाळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहिलेल्या करिश्माने 2012मध्ये 'डेंजरस इश्क' सिनेमातून पुनरागमन केले. मात्र या सिनेमातून तिच्या पदरी अपयश पडले. सध्या ती विविध मॉडेलिंगच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.
लोलो बालपणीपासून आपल्या आई-वडिलांची लाडकी आहे. तिचे दादा दिवंगत राजकपूर हेसुध्दा तिचे खूप लाड करत होते. असे आम्ही नव्हे तिच्या बालपणीची छायाचित्रे सांगत आहेत. इंटनेटवर करिश्माचे अनेक छायाचित्रे उपलब्ध आहेत...
करिश्माची बालपणीची 10 छायाचित्रे तुम्हीही बघू शकता... पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा...
(नोट: सर्व छायाचित्रे इंटरनेटच्या विविध माध्यमातून घेतली आहेत.)