आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special : Childhood Pictures Of Sonam Kapoor

29 वर्षांची झाली बॉलिवूडची स्टाइलिश दीवा, पाहा सोनम कपूरचे बालपणीचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूडची स्टाइलिश अभिनेत्री सोनम कपूर आज 29 (9 जून) वर्षांची झाली आहे. 9 जून 1985 रोजी तिचा जन्म मुंबईमध्ये झाला. ती बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. 2007मध्ये सोनमने संजयलीला भन्साळी यांच्या 'सावरिया' सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिचा को-स्टार बेशर्म बॉय नावाने ओळखला जाणारा रणबीर कपूर होता.
मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. परंतु सोनमच्या दमदार अभिनयामुळे तिचे नाव फिल्मफेअर उत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री)साठी घोषित करण्यात आले होते. खूप कमी लोकांना माहित आहे, की 'सावरिया'पूर्वी सोनम 2005मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी अभिनीत 'ब्लॅक' सिनेमात दिसली होती. ती या सिनेमाची सहाय्यक-दिग्दर्शिका होती.
सोनमला 2010मध्ये आलेल्या 'आय हेट लव्ह स्टीरी'मधून प्रसिध्दी मिळाली. हा एक रोमाँटिक-कॉमेडी सिनेमा होता. 2013मध्ये तिच्या 'भाग मिल्खा भाग'ने बॉक्स ऑफिसवर यश संपादन केले. सोबतच या सिनेमाने अनेक पुरस्कार आपल्या नावी केले आहेत. या सिनेमासाठी सोनम कपूरचे नाव फिल्मफेअर अवॉर्डसह अनेक अवॉर्ड समारंभात घोषित करण्यात आले. सोनम एक बॉलिवूड अभिनेत्रीच नव्हे तर मॉडेलसुध्दा आहे.
तीन भाऊ-बहिणींमध्ये सर्वात मोठा आहे सोनम
सोनम कपूर अभिनेता अनिल कपूर आणि माजी मॉडेल सुनीता कपूर यांची मुलगी आहे. तिला हर्षवर्धन आणि रिया असे दोन भाऊ-बहीण आहेत. ती अर्जुन कपूरची कजिन आहे. तसचे, तिचे शिक्षण आर्य विद्या मंदिर, जुहू मुंबई येथे झाले आहे.
सोनम कपूर बालपणापासून खूप नटखट आहे. असे आम्ही नाही म्हणत आहोत, हे तिच्या छायाचित्रांकडे बघून दिसत आहे. या छायाचित्रांमध्ये कधी ती आपल्या वडीलांसोबत धमाल करताना दिसत आहे तर कधी बहीणसोबत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा सोनमची बालपणीची काही नटखट छायाचित्रे...