आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 29 वर्षांची झाली दीपिका, पाहा बालपणीपासून ते आतापर्यंतचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीपिका पदुकोण)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण 29 वर्षांची झाली आहे. 5 जानेवारी 1986 रोजी तिचा जन्म कोपेनहेगेन, डेन्मार्कमध्ये झाला. दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन खेळाडू आणि आई ट्रॅव्हल एजेंट आहे. तिची धाकटी बहीण अनीशा गोल्फर आहे. दीपिका एक वर्षांची असताना तिचे कुटुंबीय बंगळुरुला शिफ्ट झाले होते.
बंगळुरुच्या सोफीया हाय स्कूलमध्ये दीपिकाने शालेय शिक्षण पूर्ण केले आणि येथील माऊंट कारमेल कॉलेजमधून तिचे पदवी शिक्षण झाले. त्यानंतर दीपिकाने सोशियोलॉजीमध्ये बीए करण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. परंतु शिक्षण अर्ध्यात सोडून ती मॉडेलिंगकडे वळाली.
2006मध्ये दीपिकाने 'ऐश्वर्या' या कन्नडी सिनेमात काम केले. या सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. त्यानंतर एका वर्षानी अर्थातच 2007मध्ये तिने फराह खानच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'ओम शांती ओम' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. या सिनेमात दीपिकाच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. या सिनेमासाठी दीपिकाला फिल्मफेअर उत्कृष्ट पर्दापणाचा पुरस्कार मिळाला. दीपिकाने आतापर्यंत जवळपास 25 सिनेमांत काम केले. तिचे 'पीकू', 'तमाशा', आणि 'बाजीराव मस्तानी' हे सिनेमे या वर्षी रिलीज होणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दीपिका पदुकोणची बालपणीपासून ते आतापर्यंतची छायाचित्रे...