आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हीरो होण्यासाठी आलेले अमरिश पुरी झाले व्हिलन, जाणून घ्या त्यांच्याविषयी बरेच काही...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : अमरीश पुरी)
मुंबई - 'मोगॅम्बो खूश हुआ'...'त्या' भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. 'मि. इंडिया' या सिनेमात अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्रभूमिका साकारणारे अमरिश पुरी यांची 22 जून रोजी 82 वी जयंती होती. अमरिश पुरी यांचा जन्म 22 जून 1932 रोजी जालंधरमध्ये झाला होता.
भारदस्त आवाज, भेदक नजर आणि करारी, देखणे रुप असलेले ज्येष्ठ हिंदी चित्रपट-नाट्य अभिनेते अमरिश पुरी यांनी हिंदी सिनेमासृष्टीवर अनेक वर्षे राज्य केले. हिंदी आणि आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये अमरिश पुरी यांना क्लासिक नकारात्मक भूमिकांसाठीही स्मरले जाते. पाश्चिमात्य प्रेक्षकांमध्येही अमरिश पुरी लोकप्रिय अभिनेते आहेत. स्टीवन स्पिलबर्ग यांच्याबरोबरील 'इंडियाना जोन्स' या हॉलिवूड सिनेमातील मोला रामची भूमिका आणि 'टेंपल ऑफ डूम' (1984) या सिनेमातील भूमिकेसाठी प्रेक्षक त्यांना कधीही विसरु शकत नाही. 12 जानेवारी 2005 रोजी अमरिश पुरी यांनी या जगाचा निरोप घेतला.

अमरिश पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया अमरिश पुरी यांच्या जीवनातील तुम्हाला ठाऊक नसलेल्या गोष्टींवर...

हीरो होण्यासाठी जालंधरहून मुंबईत आले होते अमरिश पुरी...

भारदस्त आवाज, भेदक नजर आणि करारी, देखणे रुप असलेल्या अमरिश पुरी यांना बॉलिवूड सिनेमांमध्ये हीरो बनायचे होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. ते हीरो नाही मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक बनले. अमरिश पुरी यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक नकारात्मक भूमिका साकारल्या.
आपल्या वडिलांविषयी राजीव पुरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की ''पापा तारुण्याच्या काळात हीरो होण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचे थोरले बंधू मदन पुरी सिनेसृष्टीत कार्यरत होते. निर्मात्यांनी त्यांना सांगितले, की त्यांचा चेहरा हीरोसारखा नाहीये. त्यामुळे ते खूप निराश झाले होते.''