(फाइल फोटोः प्रेम चोप्रा)
मुंबईः खलनायक हा दुष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून कथानकामध्ये त्याची वाईट माणसाची भूमिका असते. भारतीय हिंदी सिनेसृष्टीत अभिनेते प्रेम चोप्रा अशाच खलनायकाच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेम चोप्रा यांनी हिंदी आणि पंजाबी सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे.
आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 300हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. 23 सप्टेंबर 1935 रोजी लाहोर (पाकिस्तान) येथे एका पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना अभिनयासोबतच डायलॉग डिलिव्हरीसाठी ओळखले जाते.
सिनेमाच्या इतिहासात त्यांचे असे अनेक डायलॉग्स आहेत, जे आजही सिनेरसिकांच्या ओठी रेंगाळतात. प्रसिद्ध अभिनेता राज कपूर यांचे मेव्हणे आणि अभिनेता शर्मन जोशी, विकास भल्ला यांचे सासरे असलेले प्रेम चोप्रा एकमेव असे कलाकार आहेत, ज्यांनी कपूर घराण्यातील सर्व पिढ्यांसोबत (पृथ्वीराज कपूर यांच्या पासून ते
रणबीर कपूरपर्यंत) काम केले आहे.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांचे सुपरहिट डायलॉग्स सांगत आहोत...
डायलॉग नं. 1: 'नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या'
डायलॉग नं. 2: 'लोग तो आस्तीन में सांप पालते हैं, लेकिन तुम तो आस्तीन के बिच्छू निकले'
सिनेमा : दूल्हे राजा
वर्ष : 1998
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, प्रेम चोप्रा यांचे सुपरहिट डायलॉग्स आणि पाहा त्यांची छायाचित्रे...