आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: बालपणी 'डाल्डा' म्हणून चिडवायचे लोक, निर्मात्याने केले होते अपमानित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- माला सिंह)
मुंबई- 11 नोव्हेंबर 1936 रोजी नेपाळमध्ये जन्मलेल्या माला सिंह आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या. त्यांच्या अभिनयाची जादूदेखील प्रत्येकाच्या मनावर चालत होती. 'जय वैष्णो देवी', 'श्रीकृष्ण लीला', 'जोग बियोग' आणि 'ढोली'सारख्या बंगाली सिनेमांमधून आपल्या करिअरला सुरुवात करणा-या या अभिनेत्रीने जवळपास पाच दशकांपर्यंत सिनेसृष्टीत आपला जम बसवला होता. फिल्मी करिअरमध्ये त्यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिका वठवल्या.
करिअरला सुरूवात करण्यासाठी माला बॉलिवूडच्या एका निर्मात्याला भेटल्यानंतर त्यांने त्यांना अपमानित करून म्हणाला, 'आधी आरशात चेहरा बघ. असे मोठे नाक असूनही अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगतेस.' माला सिंह आपला 78वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला त्यांच्या वाढदिवसाते औचित्य साधून जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही रंजक गोष्टी...
१. 60च्या दशकात या अभिनेत्रीचा जन्म जरी नेपाळमध्ये झालेला असला तरी तिचे वडील अल्बर्ट बंगालचे होते. त्यामुळेच लोक त्यांना नेपाळ-भारतीय बाला म्हणून ओळखतात. त्यांची आई नेपाळची आहे.
२. माला सिंहा यांचे बालपणीचे नाव आल्डा होते. परंतु त्यांना शाळेत त्यांचे फ्रेंड्स डाल्डा म्हणून चिडवत असे. तिला आल्डा नावाने चिडवत असल्याने त्यांच्या आईचे नाव बदलून माला ठेवले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या माला सिंह यांच्याविषयी रंजक गोष्टी...