आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: 64 वर्षांचे झाले नसीरुद्दीन शाह, पाहा त्यांचे विविध 12 LOOKS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जॅकपॉट' (2013) सिनेमात नसीरुद्दीन शाह यांचा लूक आणि सोबतच, अभिनेत्री सनी लिओन
मुंबई: बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह आज 64 वर्षांचे झाले आहेत. 20 जुलै 1950 रोजी उत्तर प्रदेशमधील बाराबंकीमध्ये जन्मलेल्या नसीर यांचे वडील आर्मी ऑफिसर होते. त्यांनी अजमेरच्या सेंट एन्सेल्स स्कूल आणि सेंट जोसेफ कॉलेज , नैनीतालमधून शिक्षण घेतले. अलीगढ मुस्लिम यूनिव्हर्सिटीमधून आर्टमधून पदवी मिळवल्यानंतर 1971मध्ये नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. इथून अभिनयाचे धडे घेतल्यानंतर त्यांनी मेनस्ट्रीम आणि पॅरेलल सिनेमामध्ये खूप नाव कमावले.
त्यांनी केवळ बॉलिवूडच नव्हे तर, हॉलिवूड सिनेमांमध्येसुध्दा अनेक भूमिका साकारून ओळख निर्माण केली. तसे पाहता, नसीर यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे, परंतु त्यातील काही सिनेमे असे आहेत. ज्यामध्ये नसीर यांनी साकारलेल्या भूमिका आजही अविस्मरणीय आहेत. मग 1983मध्ये आलेल्या 'मासूम'मधील भूमिका असो अथवा 1980मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम पांच'मधील पात्र असो. तसे पाहता, नसीर मेनस्ट्रीम सिनेमांमध्ये 'हम पांच' सिनेमाच्या माध्यमातूनच सक्रिय झाले होते. 'त्रिवेदी' (1985), 'कर्मा' (1986, मल्टीस्टारर), 'इज्जत' (1987), 'जलवा' (1988), 'गुलामी' (1985), आणि 'विश्वात्मा' (1992)सारख्या अनेक सिनेमांमध्ये नसीर यांनी बरीच ओळख निर्माण केली.
1994मध्ये 'मोहरा'मध्ये एका खलनायकाची भूमिका वठवून त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले. 70च्या दशकापासून सतत सिनेमांमध्ये सक्रिय असलेले नसीरुद्दीन शाह यांनी हिंदीसह तामिळ, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली, तेलगू, पंजाबी, उर्दू आणि कन्नडी भाषांमध्ये काम केले. जेव्हापासून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून एकही वर्ष असे गेले नाही, की त्यांचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. यावर्षीसुध्दा तेलगूमध्ये त्यांचा 'नालुपू रानी' आणि हिंदीमध्ये 'डेढ इश्किया' सिनेमे रिलीज झाले आहेत. यावर्षी त्यांचा तिसरा सिनेमा 'फाइंडिग फॅनी' रिलीजसाठी तयार आहे.
आपल्या करिअरमध्ये नसीरुद्दीन यांनी प्रत्येक भूमिका साकारली आहे आणि प्रेक्षकांनी त्यांच्या अनेक भूमिकांना भरभरून पसंती दिली आहे. प्रत्येक पात्रातून नसीर प्रेक्षकांना आपला नवीन चेहरा दाखवतात.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्यांचे काही लूक्स दाखवत आहोत. ज्यामध्ये नसीर यांनी साकारलेले विविध पात्र दिसणार आहेत. नसीरुद्दीन शाह यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचे वेगवेगळ्या भूमिका पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...