आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: 34 वर्षांची झाली नेहा धुपिया, पाहा तिचे खासगी आयुष्यातील निवडक PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : नेहा धूपिया)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आज आपला 34वा वाढदिवस साजरा करत आहे. 27 ऑगस्ट 1980 रोजी केरळमधील कोच्ची येथे एका पंजाबी कुटुंबात नेहाचा जन्म झाला. दिल्लीच्या आर्मी स्कुलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने जीजस अँड मेरी कॉलेज, नवी दिल्लीमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. 2002 मध्ये नेहाने फेमिना मिस इंडियाचा खिताब आपल्या नावी केला. 2004 मध्ये जुली या सिनेमाच्या प्रमोशनवेळी एक वादग्रस्त वक्तव्य करुन नेहा प्रसिद्धीझोतात आली होती. तिने म्हटले होते, "बॉलिवूडमध्ये केवळ सेक्स आणि शाहरुख विकले जातात."
मिस युनिव्हर्स स्पर्धेत पटकावले टॉप 10मध्ये स्थान...
फेमिना मिस इंडिया आणि फेमिना मिस युनिव्हर्सचा ताज आपल्या नावी केल्यानंतर नेहाने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत ती जिंकू शकली नाही, मात्र टॉप 10मध्ये स्थान पटकावण्यात ती यशस्वी झाली होती.
2003 मध्ये घेतली बॉलिवूडमध्ये एन्ट्री...
नेहाने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 2003मध्ये 'कयामत सिटी अंडर थ्रीट' या सिनेमाद्वारे केली होती. हॅरी बाजवा दिग्दर्शित या सिनेमात नेहाने अजय देवगणच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करु शकला नव्हता. नेहाला खरी ओळख प्राप्त झाली ती 'जुली' या सिनेमाद्वारे. 2004 मध्ये रिलीज झालेल्या दीपक शिवदासानी दिग्दर्शित या सिनेमात नेहाने साकारलेली बोल्ड भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.
नेहाचे निवडक सिनेमे...
'कयामत : सिटी अंडर थ्रीट' (2003), 'जुली'(2004), 'शीशा' (2005), 'क्या कूल हैं हम' (2005), 'गरम मसाला' (2005), 'चुप-चुप के' (2006), 'शूट आउट अट लोखंडवाला' (2007), 'दस कहानियां' (2007), 'सिंह इज किंग' (2008), 'दे दनादन' (2009), 'एक्शन रीप्ले' (2010) आणि 'रश' (2012) हे नेहाचे बॉलिवूड सिनेमे आहेत. हिंदीशिवाय नेहाने मल्याळम, तेलगू, जपानी, उर्दू आणि पंजाबी भाषांच्या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नेहाची खासगी आयुष्यातील निवडक छायाचित्रे..