आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: टॉलिवूडमध्ये पहिलाच सिनेमा ठरला ब्लॉकब्लस्टर, मात्र बॉलिवूडमध्ये फ्लॉप झाली ही अभिनेत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेत्री नेहा ओबेरॉय)
टॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्ये नशीब अजमावणारी अभिनेत्री नेहा ओबेरॉय आज 29वा वाढदिवस साजरा करत आहे. 15 सप्टेंबर 1985 रोजी तिचा जन्म मुंबईमध्ये झाला. नेहा सिनेमा निर्माता धरम ओबेरॉय यांची मुलगी आणि दिग्दर्शक संजय गुप्ता यांची भाची आहे.
तेलगू सिनेमामधून सुरु केले करिअर
फिल्मी बॅकराउंड असल्याने नेहाला अभिनय क्षेत्राची निवड करणे सोपे होते. तिने तेलगू सिनेमामधून फिल्मी करिअरला सुरुवात केली. तिचा ‘Balu ABCDEFG’ (2005) हा पहिला ब्लॉकब्लस्टर सिनेमा होता. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कष्ट सहाय्यक अभिनेत्री फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. शिवाय, आणखी एका 'ब्रह्मास्त्रम' (2006) या तेलगू सिनेमात ती झळकली आहे.
2007मध्ये बॉलिवूडमध्ये केले पदार्पण
बॉलिवूडमध्ये नेहाने 'दस कहानिया' (2007) सिनेमामधून बॉलिवूडमध्ये एंट्री ‎घेतली. त्यानंतर तिने 'EMI' (2008) आणि 'वुडस्टॉक व्हिला' (2008) या सिनेमांमध्ये दिसली. परंतु हवे तसे यश संपादन करू शकली नाही. 'वुडस्टॉक व्हिला'मध्ये तिने केलेल्या अभिनयाची प्रशंसा मात्र झाली. परंतु सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
सध्या ती इमरान खानसह एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशाही बातम्या येत आहेत, की नेहाने अक्षय कुमार अभिनीत 'ब्लू'च्या 'आसमान' हा सीक्वल साइन केला आहे.
हिरा व्यापा-यासह अडकली लग्नगाठीत
फिल्मी करिअर यशाच्या मार्गाने जात नसताना नेहाने डिसेंबर 2010मध्ये हिरा व्यापारी विशाल शाहसोबत लग्न केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा नेहा ओबेरॉयची काही छायाचित्रे...