आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: 26 वर्षांची झाली 'फालतू' फेम पूजा, पाहा या माजी मिस इंडिया यूनिव्हर्सचे निवडक Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: पूजा गुप्ता)
मुंबई: माजी मिस इंडिया यूनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा गुप्ता आज 26 वर्षांची झाली आहे. 6 जुलै 1988 रोजी तिचा जन्म दिल्लीमध्ये झाला. 2007मध्ये तिने मिस इंडिया यूनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करून सर्वत्र चर्चेला उधाण आणले होते. याचवर्षी मॅक्सिकोमध्ये आयोजित मिस यूनिव्हर्स स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि टॉप 10मध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यानंतर अनेक ब्रँड्साठी तिने मॉडेलिंग केले.
'फालतू' सिनेमामधून केली बॉलिवूड करिअरला सुरूवात
पूजा गुप्ताने 2011मध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूजाच्या 'फालतू' (F.A.L.T.U) सिनेमामधून करिअरला सुरूवात केली. त्यामध्ये अरशद वासरी, रितेश देशमुख आणि जॅकी भगनानी यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंचर ती 2012मध्ये आलेल्या नील नितीन मुकेश आणि अमिषा पटेलसह 'शॉर्टकच रोमियो'मध्ये झळकली. हा सिनेमा सुसी गणेशनने दिग्दर्शित केला होता. 2013मध्ये सैफ अली खान, कुणाल खेमू आणि वीर दास अभिनीत 'गो गोवा गॉन'मध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. सध्या ती चांगली पटकथा असलेल्या सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे.
समाजसेवेत आहे सक्रिय
पूजा गुप्ता मॉडेलिंग आणि अभिनयाव्यतिरिक्त समासेवा संस्थांशी जोडलेली आहे. प्राण्यांच्या स्वातंत्र्यासाठी काम करणारी संस्था PETAसाठी तिचा मोठा सपोर्ट आहे. तसे ती लोकांना शाकाहारच्या प्रति लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करते. याव्यतिरिक्त एड्स जागरूकता अभियानांमध्यसुध्दा सक्रिय असते.
पुढील स्लाइड्सलवर क्लिक करून पाहा पूजाची 25 आणि निवडक छायाचित्रे...
नोट: सर्व छायाचित्रे इंटनेटच्या विविध स्त्रोतांतून साभार केली आहेत.