आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: दिलीप कुमार यांचे जिवलग मित्र होते राज कपूर, असे करत होते मस्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(राज कपूर यांचे गाल ओढताना दिलीप कुमार)
मुंबई- दिवंगत राज कपूर दिलीप कुमार यांचे जिवलग मित्र होते. मात्र, दिलीप साहेबांनी राज कपूर यांच्यानंतर बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. राज कपूर यांनी 1935मध्ये 'इंकबाल' सिनेमातून वयाच्या 10व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दिलीप कुमार 1944मध्ये 'ज्वारभाटा'मधून अभिनय क्षेत्रात आले. दिलीप कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की फिल्मी जगात येण्यासाठी राज कपूर यांनी त्यांना प्रेरित केले होते.

या मुलाखतीत दिलीप कुमार यांनी राज कपूर यांच्यासोबतच्या मैत्रीविषयी सांगितले होते, 'कॉलेजच्या दिवसांत माझी आणि राजची मैत्री झाली होती. आम्ही दोघे एकाच शहरात जन्मलेलो आहोत. कॉलेजच्या दिवसांत आम्ही सॉकर खेळायचो. त्यावेळी राज म्हणाले होते, तू सिनेमांत ये. परंतु मी त्यांना नकार दिला होता आणि म्हणालो, 'तू जा तुझे अब्बासुध्दा सिनेमांत आहेत, तुसुध्दा जा.' त्यानंतर मी राज कपूर यांना पहिल्यांदा एका स्टुडिओमध्ये भेटलो तेव्हा त्यांनी मला म्हणाले, 'पाहिलस मी तुला म्हणालो होतो ना तू सिनेमांत येशील.' मात्र मी त्यावेळी दुस-या कामासाठी तिथे गेलो होतो. मी जेव्हा सिनेमांत नव्हतो आणि सिनेमा जगात आलो तेव्हाही ते माझ्यासोबत होते. आमचे नाते खूप चांगले होते.'
इंटरनेटवर राज कपूर आणि दिलीप कुमार यांची काही छायाचित्रे उपलब्ध आहेत, त्यामध्ये दोघांची मैत्री झळकते. काही फोटोंमधून दिलीप साहेब राज कपूर यांचे गाल ओढताना दिसत आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राज कपूर आणि दिलीप कुमार यांची मैत्री...
नोट: दिवंगत राज कपूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे पॅकेज दाखवले जात आहे.