आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: SRKसोबत रोमान्स करु इच्छिते त्याची ऑनस्क्रिन मुलगी, Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः पहिल्या छायाचित्रात 'कुछ कुछ होता है'मध्ये शाहरुख खान सना सईदसोबत)
1998मध्ये रिलीज झालेल्या 'कुछ कुछ होता है' या ब्लॉकबस्टर सिनेमात शाहरुख खानच्या मुलीच्या भूमिकेत झळकलेली सना आज 26 वर्षांची झाली आहे. 22 सप्टेंबर 1988 रोजी मुंबईत सनाचा जन्म झाला. बालकलाकाराच्या रुपात आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी सना आता शाहरुख खानसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करु इच्छिते.
गेल्यावर्षी एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये शाहरुख खान 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या प्रमोशनसाठी पोहोचला होता, त्या रिअॅलिटी शोमध्ये सना स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तेथे तिला शाहरुखसोबत भेटण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी सनाने शाहरुखच्या प्रेयसीची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. वयाच्या आठव्या वर्षी सनाने 'कुछ कुछ होता है' या सिनेमात शाहरुखच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्यावेळी ती एका सुपरस्टारसोबत काम करत असल्याचे कदाचित तिला ठाऊक नसावे.
200 मुलांमधून झाली होती सनाची निवड...
'कुछ कुछ होता है' या सिनेमात शाहरुखच्या मुलीची भूमिका साकारणा-या सनाची दोनशे मुलांमधून निवड झाली होती. यापूर्वी तिला 'हम पंछी इक डाल के' या सिनेमाची ऑफर मिळाली होती. मात्र शाळा सुरु असल्यामुळे तिच्या पालकांनी तो सिनेमा स्वीकारला नव्हता. 'कुछ कुछ होता है' या सिनेमाचे शूटिंग शाळेच्या सुटीमध्ये झाले होते. या सिनेमासाठी सनाने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार आपल्या नावी केला होता. तेव्ही ती केवळ आठ वर्षांची होती.
अॅक्टिंग करिअर...
करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या सनाने 'हर दिल जो प्या करेगा' आणि 'बादल' या सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. याशिवाय 'बाबुल का आंगन छूटे ना', 'लो हो गई पूजा इस घर की' या टीव्ही मालिकांमध्येही तिने अभिनय केला आहे. 2012 मध्ये करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे सनाने अभिनेत्री म्हणून पडद्यावर एन्ट्री घेतली.
डान्स रिअॅलिटी शो...
2001 मध्ये 'फॉक्स किड्स' रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करणा-या सनाने गेल्यावर्षी 'झलक दिखला जा 7' या सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शोमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. या शोमध्ये ती सहाव्या क्रमांवर होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सना सईदची खासगी आयुष्यातील खास छायाचित्रे...
नोटः ही सर्व छायाचित्रे सनाच्या फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आली आहेत.