आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: टेलरचा मुलगा झाला इंडस्ट्रीचा खलनायक, जाणून घ्या शक्ती कपूर यांच्या आयुष्यबद्दल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- शक्ती कपूर)
 
फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेता शक्ती कपूर त्यांच्या विविध भूमिकांसाठी ओळखले जातात. एकेकाळी परफेक्ट खलनायक म्हणून संबोधले जाणारे शक्ती कपूर यांनी नंतर विनोदी भूमिकासुध्दा साकारल्या. शक्ती कपूर आज त्यांचा 56वा वाढदिवस साजरा करत आहेत. 3 सप्टेंबर 1958 रोजी त्यांचा जन्म दिल्लीमधील पंजाबी कुटुंबात झाला.
 
शक्ती कपूर यांचे खरे नाव सुनील कपूर आहे. शक्ती यांचे वडील टेलर होते. दिल्ली यूनिव्हर्सिटीच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवी शिक्षण त्यांनी पूर्ण केल्यानंतर सिनेमांकडे कल दाखवला.
 
शक्ती कपूर यांचे कुटुंब
 
शक्ती कपूर यांनी बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेची मोठी बहीण शिवांगीसह लग्न केले. शक्ती आणि शिवांगी यांना मुलगी श्रध्दा आणि मुलगा सिध्दांत ही दोन मुले आहेत. श्रध्दा बॉलिवूड अभिनेत्री असून सिध्दांतनेसुध्दा \'शूट आउट एट वडाला\'मधून फिल्मी करिअरला सुरुवात केली आहे. शिवाय सिध्दांत अनुराग कश्यपला \'उगली\' सिनेमासाठी अस्टिस्ट करत आहे.   
 
सुनील दत्तने दिला होता ब्रेक
 
शक्ती कपूर सर्वात आधी सुनील दत्त यांनी \'रॉकी\' सिनेमातील एक भूमिका ऑफर केली होती. त्यापूर्वी त्यांनी अनेक छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या होत्या. परंतु रॉकीचे पात्र साकारल्यानंतर यश त्यांच्या पदरी पडले होते. या सिनेमात घेतल्यानंतर सुनील यांनी सुनील कपूर यांचे नाव बदलून शक्ती ठेवले. कारण सुनील नाव सिनेमाच्या खलनायकाच्या पात्राला शोभत नव्हते.
 
ब्लॉकब्लस्टर सिनेमांनी शक्ती कपूर यांना केले प्रसिध्द
 
\'रॉकी\' सिनेमानंतर \'कुर्बानी\', \'हिम्मतवाला\'सारख्या अनेक सिनेमांत शक्ती कपूर खलनायकाच्या भूमिकेत झळकले. ब्लॉकब्लस्टर सिनेमांनंतर इंडस्ट्रीचे प्रसिध्द खलनायक बनले आणि त्यांना बॉलिवूडमध्ये स्थान मिळाले. 80 आणि 90च्या दशकात शक्ती कपूर किंवा अमरीश पूरीच खलनायकाचे पात्र साकारायचे.
 
अनेक अविस्मरणीय कॉमिक भूमिका
 
90च्या दशकात शक्ती कपूर यांनी कॉमिक भूमिका साकारायला सुरुवात केली. 1994मध्ये आलेल्या डेव्हिड धवन यांच्या \'राजा बाबू\' सिनेमातील \'नंदू\'चे पात्र आजही लोटपोट हसायला भाग पाडते. त्यासाठी त्यांना उत्कृष्ट विनोदवीरचा पुरस्कार मिळाला होता. विनोदी भूमिका साकारलेले त्यांचे इन्साफ, बाप नंबरी बेटा 10 नंबरी, अंदाज अपना अपना, तोहफा, चालबाज, बोल राधा बोलसारखे अनेक सिनेमे सामील आहेत.
 
400पेक्षा जास्त सिनेमांत केले काम
 
शक्ती कपूर यांनी करिअरमध्ये 400पेक्षा जास्त सिनेमे केले. नायक-नायिकाची जोडी सिनेमासाठी महत्वाची असते. परंतु एक काळ होता, की शक्ती कपूर आणि कादर खान यांची जोडी सिनेमा हिट करण्यासाठी पुरेसी होती.
 
जेव्हा कास्टिंग काउचच्या आरोपात अडकले शक्ती कपूर
 
शक्ती कपूर यांची प्रतिमा बॉलिवूडमध्ये कशी आहे हे लपून नाहीये. एकिकडे खलनायकाविषयी बोलले तर शक्ती कपूर यांचे नाव आठवतेच आठवते. मात्र जेव्हा कधी लैंगिक शोषणाचा विषय निघतो तेव्हासुध्दा त्यांचे नाव पुढे येते. 2005मध्ये स्टिंग ऑपरेशनदरम्यान कास्टिंग काउचमध्ये अडकलेले आहे. एका महिला पत्रकाराला करिअर उभे करण्यासाठी मदत करण्याचे आमिष दाखून सेक्सची डिमांड केली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत शक्ती यांनी या प्रकरणाला स्पष्ट नाकारून त्याच महिला पत्रकारानेच त्यांना गोड-गोड बोलून फसवले होते असे सांगितले.
 
बिग बॉसमध्येही झाले होते सहभागी
 
शक्ती कपूर \'बिग बॉस 5\'या वादग्रस्त टीव्ही शोचे सहभागी झाले होते. सुरुवातीच्या दोन आठवड्यात ते घरातील सदस्यांचे कॅप्टनदेखील होते. परंतु चौथ्या आठवड्यात त्यांनी घरातून एक्झिट घेतली. त्यावेळी बिग बॉसच्या एका स्पर्धाला कानशिलात लगावल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शक्ती कपूर यांच्या पर्सनल लाइफची काही निवडक छायाचित्रे...