आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: अभिनेत्रीच नव्हे निर्मातीसुध्दा आहे दीया मिर्झा, पाहा तिचे ग्लॅमरस छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीया मिर्झा एक भारतीय अभिनेत्री आहे. ती मिस एशिया पॅसिफिकसुध्दा होती. आज दीया आपला वाढदिवस साजरा करत आहे. दीयाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी, हैदराबाद येथे झाला. तिचे शालेय शिक्षण हैदराबादच्या विद्यारण्य शाळेतून पूर्ण झाले. तिने पदवी शिक्षण हैदराबादच्या विद्यापीठातून आर्टमधून घेतली. त्यानंतर 2000मध्ये ती फेमिना मिस इंडिया ब्यूटीसाठी सेकंड रनर अप ठरली होती.
दीयाने फिल्मी करिअरला सुरुवात करण्यात अगोदर मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह म्हणून काम केले. सोबतच, ती टीव्ही आणि जाहिरातसाठी मॉडेलिंग करत होती. तिने लिप्टॉनसारख्या ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केली. त्यानंतर तिने 2000मध्ये अशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी केला. तिने 'रहना है तेरे दिल मे' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. त्यानंतर तिने 'दम', 'दिवानापन', 'तुमको ना भूल पाएंगे', 'तुमसा नही देखा', 'परिणिती', 'दस', 'लगे रहो मुन्नाभाई'सारख्या हिट सिनेमांत अभिनय केला.
दीया तिच्या सामजकार्यासाठीसुध्दा ओळखली जाते. दीया अभिनयासोबत निर्माती म्हणूनसुध्दा स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तिने यावर्षी रिलीज झालेला 'बॉबी जासूस' सिनेमा निर्मित केला होता. दीया 18 ऑक्टोबर रोजी बिझनेसमन साहिल संघासोबत लग्नगाठीत अडकली.
दीयाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला आज तिचे ग्लॅमरस
छायाचित्रे दाखवत आहोत...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दीयाचे फोटो...