आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमधून गायब झालेल्या या अभिनेत्रीची स्विस बँकेत आहे कोटींची माया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- महिला चौधरी)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीचे नाव परदेशातील बँकेमध्ये काळा पैसा असलेल्या यादीत समील झाले आहे. अलीकडेच एका इंग्रजी वर्तमानपत्राने काळा पैसा ठेवणा-या 1195 लोकांची यादी जाहिर केली आहे. यामध्ये सामील लोकांचे एचएसबीसी बँकेत खाते आहे. एवढेच नव्हे, वर्तमानपत्राने या लोकांच्या खात्यात किती पैसे आहेत, हेदेखील सांगितले आहे.
वर्तमानपत्राचा दावा आहे, की ज्या 1195 लोकांची यादी जाहिर केली आहे, त्यांच्या खात्यात जवळपास 25 हजार 400 कोटी रुपये आहेत. मात्र एकट्या महिमाच्या खात्यात किती पैसे आहेत याचा अद्याप खुलासा झालेला नाहीये.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता ठाकरे, मुकेश अंबानी, अनिल अंबानी सुरिंदर कपूर आणि परनीत कौरसारख्या काळा पैसा ठेवणा-या दिग्गजांमध्ये महिमा चौधरीचे नाव सामील आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, सरकार 60 60 खाते धारकांच्या नावाचा खुलासा करू शकते. या खाते धारकांच्या खात्यात 1500-1600 कोटी रुपयांची रक्कम असू शकते. सरकार यांच्या चौकशीचे काम आयकर विभागाकडे सोपवू शकते.
आज आम्ही तुम्हाला काळा पैसा ठेवणा-या महिमाच्या आयुष्याविषयी काही रंजक गोष्टी सांगत आहोत...
सुभाष घई यांनी 'रितू'ला बनवले महिमा-
13 सप्टेंबर 1973 रोजी जन्मलेल्या महिला चौधरीचा जन्म दार्जीलिंगमध्ये झाला. महिमाने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात रितू चौधरी नावाने केली होती. 'परदेस' सिनेमात सुभाष घई यांनी तिला महिमाची भूमिका दिली होती. या भूमिकेनंतर रितूचे नाव महिमा पडले.
'परदेस'मध्ये दिसलेली महिमा या सिनेमापूर्वी एका जाहिरातीत आमिर खानसोबत दिसली होती. सुभाषने या जाहिरातीमध्ये महिमाला पाहिले आणि आपल्या सिनेमासाठी साइन केले. मात्र 'परदेस'मधून बॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी महिमाला हवे तसे यश मिळू शकले नाही. आपल्या पहिल्याच सिनेमासाठी महिमाने फिल्मफेअर पुरस्कार जिंकला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या महिमाच्या आयुष्यातील माहित नसलेल्या गोष्टी...