आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blind Photographer Clicked Katrina Kaif's Photographs

VIDEO+PHOTOS: जेव्हा एका अंध फोटोग्राफरच्या कॅमे-यात कैद झाली कतरिना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कतरिनाची छायाचित्रे क्लिक करताना फोटोग्राफर भावेश पटेल)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा एक व्हिडिओ अलीकडेच युट्युबवर आला आहे. या व्हिडिओत कतरिना एका प्रसिद्ध ब्रॅण्डच्या परफ्युमसाठी शूट करताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला स्टायलिस्ट कतरिनाचा मेकअप करताना आणि एक तरुण तिची छायाचित्रे क्लिक करताना दिसत आहे. कतरिनाचे ग्लॅमरस रुप कॅमे-यात कैद करणारा हा तरुण अंध आहे, असे जर आम्ही तुम्हाला सांगितले, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना... मात्र हे सत्य आहे. या तरुण फोटोग्राफरचे नाव आहे भावेश पटेल.
या व्हिडिओला भावेशाचा व्हॉइस ओव्हरसुद्धा आहे. स्त्रीचे रूप हे केवळ दिसण्यावर नसून, तिच्या स्त्रीपणात आहे, असे भावेश म्हणतोय.
या छायाचित्रांबद्दल खुद्द कतरिनानेदेखील भावेशचे कौतुक केले आहे. आपल्या अंधत्वावर मात करून भावेशने आपली आवड जोपासली आहे. त्याच्या या कामावर प्रत्येकजण आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
नोटः मुळचा मुंबईचा असलेल्या भावेशच्या फोटोग्राफीने प्रभावित होऊन त्याला प्रसिद्ध परफ्युम ब्रॅण्डने 2014ची बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री कतरिना कैफचे फोटोसेशन करण्याची संधी दिली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फोटोसेशनवेळी कतरिना आणि भावेश, भावेशने क्लिक केलेली कतरिनाची खास छायाचित्रे...