आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Blue Film Clip Instead Of Songs Played At Music Launch

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्लू फिल्मने उडवली आयोजकांची झोप, इव्हेंटमध्ये अचानक लागली पोर्न क्लिप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुरली शर्मा, साशा आगा, सुनील शेट्टी, टिया बाजपेय, जय भानूशाली आणि अखिल कुमार)
मुंबई: सिनेमा दिग्दर्शक आनंद कुमार यांच्या 'देसी कट्टे' या आगामी सिनेमाच्या म्युजिक लाँचिंग इव्हेंटमध्ये आयोजकांना एका लाजीरवाण्या घटनेला सामोरे जावे लागले आहे. नवी दिल्लमध्ये आयोजित या इव्हेंटमध्ये सिनेमाच्या ऑडियो व्हिज्युअल गाण्याच्यामध्ये ब्लू फिल्मची क्लिप चालू झाली होती. हा क्लिप काही वेळात त्वरीत बंद करण्यात आली. या क्लिपने सर्वांना धक्काच बसला.
एका सूत्राच्या सांगण्याप्रमाणे, 'सिनेमाचे गाणे चालू असतानाच अचानक पोर्नोग्राफीची क्लिप लागली. ही क्लिप त्वरीत बंद करण्यात आली. हा प्रकार पाहून सिनेमाचे कास्ट, क्रू मेंबर्स आणि गेस्ट एका क्षणासाठी थक्क झाले.'
आनंद कुमार दिग्दर्शित या सिनेमात सुनील शेट्टी, जय भानूशाली, आशुतोष राणा, टिया बायपेय, साशा आगा आणि अखिल कपूर दिसणार आहेत. अखिल कपूर सिनेमातून पदार्पण करत आहे. तो विनोद खन्ना यांचा भाचा आहे. म्युजिक दिग्दर्शक कैलाश खेरसुध्दा या इव्हेंटमध्ये सामील झाले होते.
सूत्राच्या सांगण्यानुसार, इव्हेंटमध्ये ब्लू फिल्म अचानक लागण्याचे कारण टेक्निकल टीमला विचारल्यानंतर त्यांना यामधील काहीच माहित नसल्यासारखे त्यांनी सांगितले. त्यांनी अभिनेत्यांवर कमेन्ट्स करण्यास सुरुवात केली होती. ते ऐकून अखिल भडकला. त्याच्या आणि टेक्निकल टीमच्या एका व्यक्तीमध्ये वाद सुरु झाला होता.
याविषयी सिनेमाचे दिग्दर्शक आनंद कुमार यांनी सांगितले, 'हे सर्व काही वेळासाठी घडले. मात्र खूप लाजीरवाणी घटना होती. इव्हेंटमध्ये आमचे कुटुबीय सदस्य उपस्थित होते. आम्ही लोकलच्या काही लोकांनी टेक्निकल भाग सांभाळण्यास दिला होता. मात्र त्यांनी त्यांच्या कम्प्यूटरमध्ये असलेली क्लिप इव्हेंटमध्ये लावली.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या पोस्टरसह 7व्या स्लाइडमध्ये ट्रेलर...