आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BNPA Photographers Boycott Salman Khan’S Forever

फोटोग्राफर्सशी वाद भोवला, BNPAने सलमावर घातली बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: सलमान खान
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि मुंबईच्या फोटोग्राफर्स यांच्यामध्ये चालू असलेला वाद संपुष्टात येण्याऐवजी वाढत जात आहे. फोटोग्राफर्स बायकॉट करण्याच्या या निर्णयानंतर सलमान खानने टि्वट केल्याने प्रकरण चिघळले होते. त्याने टि्वट केले होते, 'मी खूप आनंदी आहे आणि फोटोग्राफर्स जरी त्यांच्या निर्णयावर ठाम असले तरी मी त्यांचा आदर करतो.' आता फोटोग्राफर्स असोसिएशनने सलमान खानच्या प्रतिक्रियेमुळे नाराज होऊन त्यांना बायकॉट करण्याचा निर्णय घेतला.
सलमानच्या अशा टि्वटने बॉम्बे न्यूज फोटोग्राफर्स असोसिएशन (BNPA)च्या संबंधित नाराज झालेल्या फोटोग्राफर्सनी सलमान खानचे बायकॉट करण्याचा निर्णय घेतला. असोसिएशनच्या वतीने फोटोग्राफर्सना पाठवलेल्या एका सुचनेत लिहिण्यात आले, की 'बॉम्बे न्यूज फोटोग्राफर्स असोशिएशनशी संबंधित फोटोग्राफर्स बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे फोटो काढणार नाहीत. ज्या कार्यक्रमाचा सलमान होस्ट किंवा गेस्ट असेल त्या कार्यक्रमाचे बायकॉट करावे.'
का होते प्रकरण
11 जुलै रोजी 'किक'च्या 'डेव्हिल' गाण्याचे लाँचिंगमध्ये उपस्थित एक सुत्राने सांगितले, 'फोटोग्राफर गर्दीमध्ये सलमानची बेस्ट पोज घेऊ इच्छित होते. मात्र, त्यासाठी त्यांनी सलमानच्या बाउंसर्सना थोडी जागा करण्यास सांगितली. यावर फोटोग्राफर्सना साहाय्य करण्याऐवजी क्लबच्या मॅनेजरने फोटोग्राफर्सशी गैवर्तणूक केली आणि एका फोटोग्राफरवर अशाप्रकारे ओरडला, की त्यांची मनस्थिती बिघडली. एवढेच नव्हे तर, क्लबमध्ये फोटोग्राफर्सना एब्यूज करण्यात आले.'

या घटनेनंतर फोटोग्राफर्सने सलमान खानचे बायकॉट करण्याचा निर्णय घेतला. यावरच हे प्रकरण थांबले नाही तर, सलमाननेसुध्दा यावर अनपेक्षित प्रतिक्रिया दिली, तो म्हणला, 'ज्याला वाट पाहायची आहे ते पाहू शकता, ज्याला इव्हेंटमध्ये थांबण्याची इच्छा नाहीये ते जाऊ शकता.'

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानचे टि्वट...