आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिच्छू’च्या सिक्वलमध्ये बॉबी देओल इन, राणी मात्र आऊट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंच दिग्दर्शक लुक बेसो यांच्या 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लियो’ सिनेमापासून ‘बिच्छू’ची प्रेरणा घेण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांमध्ये सिनेमांपासून कोसो दूर असलेल्या बॉबी देओलला एका हिट सिनेमाची प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिच्छू’ सिनेमाचा सिक्वल बनवण्यात येणार असल्याची बातमी बॉबीसाठी एक शुभसंकेत मानला जात आहे. हा सिक्वल ‘बिच्छू’चे दिग्दर्शक गुड्ड धानाओ बनवत आहेत. मूळ सिनेमात बॉबी देओलने जिवा नावाच्या खतरनाक हत्यार्‍याची भूमिका साकारली होती.
सिनेमात बॉबीसोबत राणी मुखर्जीची भूमिका होती. ‘बिच्छू’च्या सिक्वलमध्ये बॉबी देओलला पुन्हा संधी दिली जाणार असली तरी राणी मुखर्जीच्या जागी अन्य अभिनेत्रींचा शोध घेतला जाणार आहे. हा सिक्वलदेखील पूर्णपणे अ‍ॅक्शन सिनेमा असेल. सध्या पटकथा लिहून तयार असून निर्मितीशी संबंधित तयारी सुरू आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत या सिक्वलच्या शूटिंगला सुरुवात होऊ शकते.