आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अभिनेत्याचे बॉबी नव्हे \'विजय\' आहे खरे नाव, जाणून घ्या स्टार्सचे Real Names

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः बॉबी देओल)

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आज आपला 46 वा वाढदिवस साजरा केला. 27 जानेवारी 1969 रोजी बॉबीचा जन्म झाला. इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्यांमध्ये बॉबीची गणना होते. सध्या त्याने फिल्म इंडस्ट्रीतील काम कमी केले असून अधूनमधून इव्हेंटमध्ये त्याची झलक बघायला मिळत असते. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बॉबीने हजेरी लावली होती.
बॉबी इंडस्ट्रीतील हँडसम आणि चार्मिंग अॅक्टर आहे. बॉबी हे नाव त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशे आङे. मात्र बॉबी हे त्याचे खरे नाव नसल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. बॉबीचे खरे नाव विजय सिंह देओल आहे.
1995मध्ये 'बरसात' या सिनेमाद्वारे विजय सिंह देओलने बॉबी या नावाने इंडस्ट्रीत पदार्पण केले. आपल्या करिअरमध्ये बॉबीने 'बरसात', 'गुप्त', 'सोल्जर', 'बादल', 'अजनबी', 'हमराज', 'अपने', 'दोस्ताना', 'यमला पगला दीवाना' या हिट सिनेमांमध्ये काम केले आहे.
बॉलिवूडमध्ये नाव बदलून एन्ट्री घेणा-या कलाकारांची यादी मोठी आहे. यामध्ये गोविंदा, अजय देवगण, अक्षय कुमार आणि प्रिती झिंटा यांच्यासह नवोदितांचाही समावेश आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणकोणत्या कलाकारांनी आपले खरे नाव बदलून इंडस्ट्रीत पदार्पण केले...