आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बॉबी जासूस'च्या प्रमोशनवेळी विद्याचे दिसले विविध अंदाज, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनसध्या 'बॉबी जासूस' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्त ती शुक्रवारी (20 जून) हैदराबादला पोहोचली होती. तिथे तिने एक पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान तिचा को-स्टार अली फजलसुध्दा उपस्थित होता. अभिनेत्री डिटेक्टिव्हच्या भूमिकेत असलेला 'बॉबी जासूस' हा भारतातील पहिलाच सिनेमा आहे. सिनेमाचे संपूर्ण शुटिंग हैदराबादच्या जून्या करण्यात आली आहे.
विद्या या इव्हेंटदरम्यान ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसली. तिने अनारकली सूट परिधान केला होता. विद्याने कानामध्ये सूटला मँचिंग होणारे एअररिंग घातले होते. इव्हेंटमध्ये विद्या खूप आनंदी दिसत होती. बातचीतदरम्यान तिचे विविध रुप पाहायला मिळाले. सिनेमात विद्या विभिन्न गेटअपमध्ये दिसणार आहे.
विद्याचा को-स्टार अली फजल पांढ-या रंगाच्या टी-शर्ट आणि राखाडी रंगाच्या सूटमध्ये दिसला. 'बॉबी जासूस' समर शेखने दिग्दर्शित केला आहे. सिनेमाची कहानी बॉबीची आहे. ती हैदराबादच्या जून्या शहरातील प्रसिध्द गुप्तहेर असते. सिनेमामध्ये विद्या 22 विविध अवतारात दिसणार आहे. कथित रुपात विद्याने 122 लूक्सचे टेस्ट दिले होते. सिनेमा दिया मिर्झाने निर्मित केले असून 4 जुलै रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा 'बॉबी जासूस'च्या प्रमोशन करण्यासाठी पोहोचलेल्या विद्या बालनची विविध अंदाज...