आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bold Bengali Actress Swastika Mukherjee Attempts Suicide

वादग्रस्त अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जीने केला आत्महत्येचा प्रयत्न, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिध्द बंगाली अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सांगितल्या जात आहे, की तिचे सिनेमा निर्माता बॉयफ्रेंडसह भांडण झाल्याने तिने असे पाऊल उचलले आहे. स्वास्तिका मुखर्जी 'डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्खी' या सिनेमात अभिनेता सुशांतसिंग राजपूतसह काम करणार आहे. हा तिचा बॉलिवूड पदार्पणाचा सिनेमा आहे.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, स्वास्तिकाने आपला हात आणि हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वास्तिकाला अशा गंभीर परिस्थितीत अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या ठिक असल्याचे कळत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे, की तिची नियमित चाचणी केली जात आहे आणि ती एका महिन्यात पूर्णत: बरी होऊ शकते.
स्वास्तिका मुखर्जीची एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख आहे. स्वास्तिका अनेकदा बोल्ड फोटोशुटमुळे चर्चेमध्ये राहिलेली आहे.
स्वास्तिकाने काचेच्या साहाय्याने स्वत:ला केले जखमी
प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन कौशिक नंदीने सांगितले, की स्वास्तिकाने आपल्या डाव्या आर्मला जखमी करून घेतले आहे. त्यामुळे शनिवार (24 मे) तिच्या हाताची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी पूर्ण एक तासांचा वेळ लागला. सोबतच, त्यांनी असेही सांगितले, की स्वास्तिकाची प्रकृती ठिक होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.
डॉ. नंदीने म्हणाले, की स्वास्तिकाने वाईटरित्या आपला हात काचीने कापून जखमी केला आहे. परंतु आता तिच्या हातून काच काढून टाकण्यात आली आहे. तिच्या प्रकृतीत सुधार होत आहे. स्वास्तिकाला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते, तेव्हा ती खूप अस्वस्थ आणि तणावाखाली होती. परंतु आता ती स्वस्थ असल्याचे जाणवत आहे.
स्वास्तिकाच्या बहिणीने आत्महत्येच्या बातम्यांना सांगितले अफवा
स्वास्तिकाची बहीण अजोपा मुखर्जीने आत्महत्येच्या बातम्यांवर पूर्णविराम लागण्यासाठी सांगितले, की स्वास्तिका पार्टीमध्ये खाली पडल्याने जखमी झाली आहे. अपोजाने असेही सांगितले, तिच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे. पार्टीमध्ये तिने हातात एक ग्लास पकडलेला होता. ती जेव्हा खाली पडली तेव्हा त्या ग्लासची काच तिच्या हातात घुसली.
जडावपूर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाविषय आणखी तपासणी करण्याची निर्णय घेण्यात आला आहे. डीसीपी ध्रुवज्योति यांनी सांगितले, की हॉस्पिटलच्या अधिका-यांकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न चालू आहे, की ही घटना होती की आत्महत्या करण्याचा प्रयत्न. या प्रकरणाविषयी कोणतेही तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये.
स्वास्तिक यापूर्वीही अडकलेली आहे वादात
बंगाली अभिनेत्री स्वास्तिकाचे नाव यापूर्वीसुध्दा वादात अडकलेले आहे. स्वास्तिकाने वयाच्या 18व्या वर्षी गायक प्रमीत सेनसह लग्न केले होते. परंतु हे लग्न यशस्वी होऊ शकले नाही.
स्वास्तिकाने आपला माजी पती प्रमीत सेनवर शरीरिक छळ केल्याचा आरोप लावला होता. एवढेच नाही तर, तिने त्याच्यचा विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदेखील दाखल करून तिला प्रेग्नेंट अवस्थेत घरात कैद करून ठेवल्याचा आरोपदेखील लावला होता.
परंतु काही कालावधीनंतर स्वास्तिकाने आपल्या माजी पतीवर लावलेले आरोप स्वत:हून फेटाळले. आरोप फेटाळण्यासह स्वास्तिकाने असेही सांगितले होते, की तिला त्यावेळी काहीच समज नव्हती आणि जसे तिच्या जवळच्या लोकांनी आणि नातेवाईकांनी तिला सांगितले तसे तिने केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा स्वास्तिकाची काही खास छायाचित्रे...