आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Actor, Actress To Use Various Types Of Goggles

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलीवूडकरांकडूनही गॉगल्सचा मोह आवरला जात नाही!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात गॉगल्स स्टाइल स्टेटमेंट बरोबरच गरज ठरली आहे. खास करून उन्हाळ्याच्या दिवसांत. या दिवसांत बॉलीवूडकरांनाही याचा मोह आवरता येत नाही. राजेश खन्ना पासून ते आजच्या नवोदित अर्जुन कपूर पर्यंत सर्वांनाच गॉगल्सची क्रेज आहे, तर पाहू कोणता अभिनेता आणि अभिनेत्री कोणते गॉगल्स वापरतात-
पूर्वी गॉगल्स वापरणे ही श्रीमंत वर्गाची मक्तेदारी होती, पण आज ती गरज बनत आहे. सूर्यप्रकाशापासून आणि फॅशन स्टेटमेंट म्हणून ओळख असणार्‍या गॉगल्सचा वापर वाढलाय सध्या बाजारात निरनिराळ्या प्रकारचे, आकाराचे आणि ब्रँडचे गॉगल्सही दाखल झाले आहेत.
उन्हापासून डोळ्याची काळजी घेणे हा गॉगलचा मुख्य उद्देश असला तरी आता गॉगल्स हे एक स्टाइल स्टेटमेंट झाले आहे. बॉलीवूडकरांना पाहून आजच्या तरुणाईमध्ये देखील गॉगल्सची क्रेझ वाढली आहे. सध्या मोठय़ा आकाराच्या समर स्पेशल गॉगल्सची प्रचंड मागणी आहे.
सध्या मार्केटमध्ये विविध शेप्समध्ये गॉगल्स उपलब्ध आहेत. यापैकी हार्ट शेप, गोलाकार गॉगल्सना जास्त मागणी आहे. बॉलीवूडकर देखील विविध शेप्स आणि रंगाचे गॉगल्स घालताना दिसतात. ते रात्रीच्या वेळी देखील गॉगल्स वापरतात, पण ही मंडळी खास कंपनीचे आणि खूपच महागडे गॉगल्स वापरतात.
सध्या फॅशन जगतात रेबॉन आणि स्पेशली रेबॉन आरबी 3025ची खूप मागणी आहे. सलमान खानने दबंग मध्ये रेबॉनचाच गॉगल्स वापरला होता आणि तो खासगी आयुष्यात देखील रेबॉनच्या गॉगल्सलाच पसंती देतो. सलमानबरोबरच शाहरुख खान, शाहिद कपूर, हृतिक रोशन आणि अजय देवगण देखील रेबॉनलाच पसंत करतात.
बॉलीवूडच्या नवोदित कलावंतांना देखील रेबॉनच्या गॉगल्सची भुरळ पडलेली आहे. यात अर्जुन कपूर, इम्रान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंह आणि आयुष्यमान खुराना यांच्या नावांचा देखील समावेश आहे. विमान चालकांच्या डोळ्यांची सुरक्षा व्हावी म्हणून 1936 मध्ये रेबॉन कंपनीचे गॉगल्स बनवण्यात आले होते, पण या गॉगल्सने अवघ्या बॉलीवूडकरांना वेड लावले आहे.
यात तारकाही मागे नाहीत. बॉलीवूडच्या अनेक तारका डी अँड जी, गुची आणि प्राडा बँड्रच्या गॉगल्सला पसंती देतात. 80 च्या दशकापासून अभिनेत्रींमध्ये गॉगल्सचे क्रेझ पाहायला मिळाले ते आतापर्यंत कायम आहे. प्रियंका चोप्रा आणि शिल्पा शेट्टीला डी अँड जीचे गॉगल्स आवडतात, तर विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय बच्चन प्राडाचे गॉगल्स वापरते. तिला गॉगल्स इतके आवडतात की ती कधी-कधी पोशाखाप्रमाणे शेड वापरते. अभिनेत्री अमिषा पटेलला व्होग्य, पर्सोल ब्रँडचे गॉगल्स आवडतात, तर सोनाक्षी सिन्हा, करिश्मा कपूर, ऊर्मिला मातोंडकर, राणी मुखर्जी डी अँड जीचे गॉगल्स वापरतात.
काही खास ब्रँडचे गॉगल्स गुची, ब्ल्यूवे, अरमानी, डायोर, रेबॉन, ओअक्ले, पर्सोल, व्होग्य, कोस्टा देल मार्र, प्राडा या ब्रँडच्या गॉगल्सची चलती आहे. काही बँड्रेड गॉगल्सनी खास वैमानिकांसाठी एव्हिटर शेपची विशेष प्रणाली डेव्हलप केली आहे.