आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय म्हणतो, 'आता मी पैशासाठी काम करत नाही'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षय कुमारने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत; पण कोणत्याही विशिष्ट भूमिकेचा ठपका त्याने स्वत:वर लावून घेतला नाही. कॉमेडी आणि अँक्शन दोन्हीवर त्याची सारखीच पकड आहे. अक्षय नेहमी नवनवीन प्रयोग करत असतो आणि तो कधीच या गोष्टीला घाबरत नाही. जोखीम घेणे त्याला आवडते. या विषयी अक्षय म्हणतो, जोखीम घेणे मला आवडते. परंपरेच्या विरुद्ध चालणाराच विशेष व्यक्ती असतो.
सध्या अक्षय कुमार सिंगापूरमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्या घालवत आहे. तो म्हणतो, या वेळी जर मी हा प्लॅन टाळला असता तर माझ्या कुटुंबानी मला घरात येऊ दिले नसते. त्यामुळे मला यावेच लागले. सुट्या घालवून अक्षय दोन दिवसांनी पुन्हा मुंबईला परतणार आहे.
'हाऊसफुल 2' आणि 'राउडी राठौर' या दोन चित्रपटांनी यावर्षी चांगला व्यवसाय केला. 100 कोटींच्या क्लबमध्ये समावेश झाल्यानंतर ते टिकून ठेवण्यासाच्या दबावाविषयी अक्षय म्हणतो, मी कधीच प्रेशर घेऊन काम करत नाही. आता ती वेळ गेला जेव्हा खिशात पैशे नसायचे आणि मी पैशासाठी कोणताही चित्रपट करायचो. आता मी पैशासाठी काम करत नाही, तर लोकांचे भरपूर मनोरंजन व्हावे आणि मनाला शांती मिळावी हाच उद्देश डोळ्यांसमोर असतो.
अक्षय शंभर कोटींच्या श्रेणीत आहे; पण त्याला थोडाही अभिमान नाही. तो म्हणतो, वडिलांच्या शिकवणीप्रमाणे मी पाय नेहमी जमिनीवरच ठेवतो. स्वार्थी आणि घमंडी माणसावर कोणी कधीच प्रेम करणार नाही, मग तो किती ही मोठा असो, असे माझे वडील नेहमी म्हणायचे. त्यामुळे मी ही गोष्ट कधीच विसरणार नाही.
जाणकारांच्या मते, सध्या इंडस्ट्रीचा 30 टक्के पैसा एकट्या अक्षयवर लागला आहे. यावर तो म्हणतो, याचा अर्थ असा की, मी अजून वयस्कर झालेलो नाही. वडील आणि भावाची भूमिकाही लवकर मिळणार नाही. यावरून कळते की, इंडस्ट्रीचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तो टिकवून ठेवील.
FIRST LOOK: 'ओह माय गॉड' ! बाईक चालवणा-या देवाच्या रुपात अक्षय
अक्षय कुमारने जे केले ते सलमान करुच शकला नाही
भविष्याचा विचार करत अक्षय विकत घेणार बेट