आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Amir Khan Comment On Box Office Ranking

बॉक्स ऑफिसच्या ९९ टक्के चित्रपटांचे आकडे खोटे, आमिर खानचे परखड मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘बाॅक्स अाॅफिसवर चारशे काेटींचा धंदा करणारा चित्रपट हा पडद्यामागे वेगळेच वास्तव सांगत असताे. ९९ टक्के चित्रपटांचे निर्माते प्रसारमाध्यमांना अत्यंत खाेटे अाकडे पुरवतात. पण प्रेक्षक अाता सजग झाले असून अाशयहीन चित्रपटाचे अाकडे कितीही माेठे असले तरी ते पाहत नाहीत,’ असे स्पष्ट मत अभिनेता अामिर खान याने मांडले.‘पीके’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तो बोलत होता.

आमिर म्हणाला, ‘पीके’ हा माझ्या २५ वर्षांच्या कारकीर्दीतील अत्यंत अवघड चित्रपट असून यातून राजकुमार हिरानी यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला अाहे. या चित्रपटाच्या अाशयाचा स्थलांतर हा एक सूक्ष्म पण महत्त्वाचा भाग आहे. चित्रपटाच्या पहिल्या वादग्रस्त पाेस्टरसंदर्भात बाेलताना त्याने न्यूडिटी अाणि अश्लीलता यातला फरक लाेकांनी समजून घेतला पाहिजे, असे सांगितले. बाॅक्स अाॅफिसवरील अधिकृत अाकडे समजण्याची व्यवस्था अमेरिकेत रेंटट्रॅक या संकेतस्थळावर मिळते. त्यामुळे त्यात चित्रपटाच्या निर्मात्यांना फेरफार करता येत नाही. भारतातही ही सुविधा येण्याची अागामी काळात शक्यता असल्याचे तो म्हणाला. ‘धाेबी घाट’सारखा वेगळा चित्रपट केल्यानंतर अाता पत्नी किरण राव अाणखी एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे तो म्हणाला.
अामिरने या वेळी सांगितले.

अाई माझा अादर्श
आयुष्यात आईला मी कायम अादर्श मानत अालाे अाहे. अाई माझी समीक्षकही अाहे. तिला माझे सुरुवातीच्या काळातील चित्रपट अावडले नव्हते. त्यानंतर मी विचार करूनच चित्रपटांची निवड केली. आता मात्र ‘पीके’ची तिने भरपूर प्रशंसा केली. तिला हा चित्रपट प्रचंड आवडल्याचे तो म्हणाला.