आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Amir Khan Say, PM Narendra Modi Watches PK Movie

PM नरेंद्र मोदींनी PK पाहावा, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची इच्छा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानचा PK हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पीके' पाहावा, अशी इच्छा आमिरने व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी हे नेहमी व्यस्त असतात. हे आपल्याला माहीत आहे. मात्र, तरीही मोदींनी आपल्या कामातून वेळ काढून 'पीके' पाहावा, असे आमिरने म्हटले आहे.
सद्या आमिर खान PK च्या प्रमोशनासाठी व्यस्त आहे. आमिर आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच ‘पीके’ पाहण्याचे निमंत्रण देणार आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात आमिरने पाटण्यातील एका मॉलमध्ये PK चे प्रमोशन केले. त्यानंतर एका ढाब्यावर ट्टी-चोखावर ताव मारला. ढाब्यावर चाहत्यांनी आमिरभोवती गराडा घातला होता.

PK येत्या 19 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. आमिर खान आणि संजय दत्त, अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि सुशांतसिंह राजपूत याने प्रमुख भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे ‘पीके’च्या प्रिमिअरसाठी पुण्यातील येरवडा तुरुंगातून संजय दत्त सुटीवर येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, PK ची छायाचित्रे...