आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday: Bollywood Actor Bobby Deol Turn 46 Year

B'day: ही आहे बॉबी देओलची पत्नी, लाइमलाइटपासून राहते दूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः पत्नी तान्या आणि मुलासोबत बॉबी देओल)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल 46 वर्षांचा झाला आहे. 27 जानेवारी 1969 रोजी मुंबईत जन्मलेल्या बॉबीला इंडस्ट्रीत यशस्वी अभिनेत्याच्या रुपात ओळखले जाते. बॉबी अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा आणि सनी देओलचा धाकटा भाऊ आहे.
बॉबीने 90च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 1995मध्ये रिलीज झालेल्या 'बरसात' या सिनेमाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री घेतली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. यापूर्वी धरम वीर या सिनेमात बॉबीने धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
'बरसात', 'गुप्त', 'सोल्जर', 'बादल', 'अजनबी', 'हमराज', 'अपने', 'दोस्ताना', 'यमला पगला दीवाना' हे हिट सिनेमे बॉबीच्या नावावर जमा आहे. बरसात या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
कुटुंबासोबत बनवले सिनेमे...
बॉबी देओल बी टाऊनमधील असा एक अभिनेता आहे, ज्याने आपल्या कुटुंबासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांनीसुद्धा देओल कुटुंबीयांच्या सिनेमांना पसंतीची पावती दिली. या सिनेमांमध्ये 'अपने', 'यमला पगला दीवाना' और 'यमला पगला दीवाना 2' या सिनेमांचा समावेश आहे.
पत्नी आहे कॉश्च्युम आणि इंटेरियर डिझायनर...
धर्मेंद्र आणि त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांचा बॉबी मुलगा आहे. बॉबीला एक थोरला भाऊ आणि दोन बहिणी आहेत. सनी हे भावाचे तर विजेयता आणि अजिता ही बहिणींची नावे आहेत. बॉबीचे लग्न तान्या आहुजासोबत झाले आहे. ती कॉश्च्युम आणि इंटेरियर डिझायनर आहे. पार्टी आणि इव्हेंटमध्ये तान्या ग्लॅमरस लूकमध्ये दिसते. या दोघांना दोन मुले असून आर्यमान आणि धरम ही त्यांची नावे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बॉबीची पत्नी तान्यासोबतची खास छायाचित्रे...