आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Dharmendra's Life Story And Unknown Family Members

B'day: 2 पत्नी आणि 6 अपत्ये, पाहा धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आज (8 डिसेंबर) आपला 79 वर्षांचे झाले आहेत. बॉलिवूडमध्ये 'अ‍ॅक्शन किंग' आणि 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाणा-या धर्मेंद्र यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांनी 'शोले' या सिनेमात साकारलेली वीरुची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आपल्या दमदार अभिनयाने धर्मेंद्र यानी प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच अधिराज्य गाजवलं.

धर्मेंद्र यांचे पहिले लग्न वयाच्या 19 व्या वर्षी झाले होते. प्रकाश कौर हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना एकुण चार मुले असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. धर्मेंद्र यांना आपल्या पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आणि दोन मुली आहेत. सनी, बॉबी, अजीता आणि विजेता ही त्यांच्या मुलांची नावे आहेत.
सनी आणि बॉबी यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर अजीता आणि विजेता फिल्म इंडस्ट्रीपासून लांब राहिल्या आणि कॅलिफोर्नियात सेटल झाल्या.
अभिनय क्षेत्राबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे धर्मेंद्र नेहमीच चर्चेत राहिले. पहिले लग्न झाले असतानादेखील धर्मेंद्र यांनी धर्म परिवर्तन करुन बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनीबरोबर आपला दुसरा संसार थाटला. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना दोन मुली असून ईशा आणि अहाना ही त्यांची नावे आहेत.

आज धर्मेंद्र यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला धर्मेंद्र यांच्या कुटुंबाची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांची छायाचित्रे...