आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Govinda On Screen Romance With Actress

करिश्मापासून कतरिनापर्यंत, रुपेरी पडद्यावर या अभिनेत्रींसोबत रोमँटिक झाला चीची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('पार्टनर'च्या एका सीनमध्ये गोविंदा आणि कतरिना कैफ)

मुंबई:
90च्या दशकात आपल्या कॉमेडी आणि डान्सने लोकांना वेड लावणारा गोविंदा यशराज फिल्म्सच्या 'किल दिल' सिनेमातून पुनरागमन करत आहे. 'किल दिल'वर चाहतेच नव्हे तर इंडस्ट्रीसुध्दा नजर टिकून आहे. सर्वांनाच त्याच्या कमबॅकची उत्सूकता लागली आहे.
गोविंदा 'किल दिल'मध्ये नकारात्मक भूमिका साकारत आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला गोविंदाने रोमँटिक हिरोच्या भूमिका साकारल्या. एकेकाळी नीलम, करिश्मा आणि रविना टंडनसारख्या अभिनेत्रींसोबतच्या गोविंदाच्या जोडीला प्रशंसा मिळत होती. शिवाय, गोविंदाने आजच्या आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफसोबतसुध्दा रोमान्स केला आहे. 'पार्टनर' सिनेमात दोघांची जोडी लोकांनी पसंत केली होती. एकेकाळी गोविंदा डान्सिंग सुपरस्टार नावाने प्रसिध्द होता. म्हणूनच तो आपल्या स्टेप फॉलो करणा-या अभिनेत्रींनाच सिनेमाची नायिका म्हणून निवडत. गोविंदाचा कॉमिक टायमिंगसुध्दा उत्तम होता.
'इल्जाम'मधून केली बॉलिवूडमध्ये एंट्री
गोविंदाने 1986मध्ये आलेल्या 'इल्जाम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात गोविंदाच्या अपोझिट नीलम मुख्य भूमिकेत होती. या सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर या जोडिने लव 86', 'खुदगर्ज', 'घर मे राम गली में श्याम', 'हत्या', 'ताकतवर', 'दो कैदी' आणि 'दोस्त गरीबो'सह जवळपास 10 सिनेमांत एकत्र काम केले.
गोविंदाने या अभिनेत्रींसोबत केला ऑनस्क्रिन रोमान्स
नीलमशिवाय गोविंदाची करिश्मासोबतसुध्दा सुपरहिट जोडी होती. करिश्मा कपूरसोबत गोविंदाने 'मुकाबला', 'प्रेम शक्ति', 'राजा बाबू', 'दुलारा', 'खुद्दार', 'कुली नंबर 1', 'साजन चले ससुराल', 'हिरो नबंर 1', 'हसीना मान जाएगी' आणि 'शिकारी'सारख्या हिट सिनेमांत काम केले. जूही चावला, फराह नाज, किमी काटकर, श्रीदेवी, माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, सुष्मिता सेन, अमृता राव आणि रिमी सेनसारख्या अभिनेत्रींसोबत गोविंदाने ऑनस्क्रिन रोमान्स करून चाहत्यांना आकर्षित केले. या अभिनेत्रींसोबतचे गोविंदाचे सिनेमाचे आजही आवडीने पाहिले जातात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून छायाचित्रांतून पाहा गोविंदाने कोण-कोणत्या अभिनेत्रींसोबत केला ऑनस्क्रिन रोमान्स...