आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Irrfan Khan Interview On 'Qissa' Movie

इरफान म्हणाला, 'किस्सा' अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनी आणि फ्रान्समध्ये दिग्दर्शक अनुप सिंह यांचा 'किस्सा' प्रदर्शित झाला. आता 20 फेब्रुवारी रोजी भारतात मुंबई, दिल्ली, चंदिगड, चेन्नई आणि कोलकाता या शहरामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यामध्ये इरफान खान अंबर सिंह नावाच्या एका व्यक्तीच्या भूमिकेत आहे. तिलोत्तमा शोम, रसिका दुग्गल आणि टिस्का चोप्राच्यादेखील चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटासाठी इरफान खान आणि तिलोत्तमा शोमला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मूळ पंजाबी भाषेतील हा चित्रपट इंग्रजीमध्येदेखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. इरफानशी झालेल्या चर्चेचा काही भाग पुढीलप्रमाणे :
>इरफान खान ब्रँड बनण्यासाठी तू कधी प्रयत्न केला?
आवर्जून मी या गोष्टीचा कधीच केला नाही. मला एक तर भूतकाळातील गोष्टींवर विचार करण्याची सवय नाही. चांगल्या चित्रपटामध्ये माझे काय योगदान राहील यावर माझे लक्ष असते.
>तुझ्या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतात.
माझा अभिनय हा नेहमी सर्वोत्तम राहावा यावर माझा भर असतो. माझ्या आयुष्यातील अनेक अनुभव मी भूमिकांद्वारे प्रेक्षकांसमोर मांड‌ण्याचा प्रयत्न करतो. या गोष्टी त्यांना पटतदेखील असतील. त्यामुळेच या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. माझ्यासाठी प्रत्येक भूमिका म्हणजे एक नवीन जग असल्यासारखे वाटते.
पुढे वाचा, मुलाखतीचा उर्वरित भाग...