आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Actor Nana Patekar News In Mararathi, Prakash Baba Amate Real Hero

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘प्रकाश आमटें’ना साकारणे म्हणजे हेमलकसासारखे- नाना पाटेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: पत्रकारांशी दिलखुलास चर्चा करताना अभिनेते नाना पाटेकर सोनाली कुलकर्णी)
मुंबई- अखेर येत्या 10 ऑक्टोबरला ‘प्रकाश बाबा आमटे : रिअल हीरो’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. गेली चाळीस वर्षे आमटे परिवारासोबत माझी नाळ जोडून आहे. प्रकाश, बाबांचा मुलगा... मला म्हणतो की, मी त्याचा धाकटा भाऊ आहे. खरेच आहे. बाबा आमटेंचा हा सगळा परिवार.

प्रकाश, मंदाकिनी यांच्याबरोबर हेमलकसामध्ये मी त्यांच्या बरोबरीने तेथील आदिवासींबरोबर, प्रकाशने जपलेल्या शेकरूसारख्या प्राण्यांबरोबर दोस्ती केली आहे. हेमलकसा मी काळानुसार बदलताना पाहिले आहे. बदलले नाही ते आमटे परिवाराचे ध्येय. अन् म्हणून प्रकाश बाबा आमटे ही व्यक्तिरेखा साकारताना मी संपूर्ण हेमलकसाच साकारतोय”, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.

पाटेकर म्हणाले, आपण लग्न करतो, हनिमूनसाठी आपला खिसा बघून कुठल्याशा निसर्गरम्य ठिकाणी जातो, चार-आठ दिवस राहतो प्रसन्न होऊन परत येतो, पण प्रकाश नि मंदाकिनी तर गेली चाळीस वर्षे निसर्गाच्या सहवासात साधं पण मुक्त आणि निकोप जीवन जगत आहेत. प्रकाशचा स्वभाव, दिसणे-वागणे बाबांच्या एकदम उलट आहे. बाबा रासवट होते, सुरुवातीला अगदी पहिलवान गड्यासारखे. शिवाय बऱ्यापैकी बोलणारे. प्रकाश एकदम मितभाषी आहे. त्यामुळे प्रकाशची भूमिका साकारताना मला त्याच्यासारखं पडद्यावर काही काळ जगता आलं. प्रकाश मंदाकिनीचं सहजीवन साकारताना हेमलकसामधल्या माडिया बोलणाऱ्या आदिवासींचं जीवन त्यांनी कसं उजळवून टाकलं यावर अधिक भर दिला. कारण प्रकाश नि मंदाकिनी यांचं काम अधिक डोळसपणे पोहोचावं, अशी चित्रपटाकडून अपेक्षा आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, नारायण राणेंचा मी ऋणी : नाना