आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे रणबीरचा Duplicate, बघून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे जुनैद शाह आणि उजवीकडे रणबीर कपूर)
मुंबई - बॉलिवूड स्टार्ससारख्या हुबेहुब दिसणा-या व्यक्ती तुम्ही बघितल्या असतील. मात्र आता बॉलिवूडचा यंगस्टार रणबीर कपूरसारखी हुबेहुब दिसणारी व्यक्ती समोर आली आहे. मुळचा जम्मू काश्मीरचा असलेल्या जुनैद शाह हा तरुण हुबेहुब रणबीर कपूरसारखा दिसतो. या तरुणाचे लूक्स रणबीरशी एवढे साधर्म्य साधणारे आहेत, की पहिल्या नजरेत हा रणबीरच तर नाही ना? असा प्रश्न कुणाचाही मनात निर्माण होईल.
आज आम्ही तुम्हाला रणबीर कपूरची कार्बन कॉपी असलेल्या जुनैदची छायाचित्रे दाखवत आहोत. हुबेहुब रणबीरसारखा दिसणारा जुनैद काश्मीरमध्ये वास्तव्याला असून त्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंग विश्वात पदार्पण केले आहे. त्याने फेसबुकवर स्वतःचे एक पेज बनवले आहे. त्यावर 'जुनैद शाह द अपकमिंग आर.के' असे लिहिण्यात आले आहे.
आपल्या लूक्समुळे जुनैद मित्रांमध्ये प्रसिद्ध आहे. आता हळूहळू फेसबुकवरसुद्धा त्याची लोकप्रियता वाढू लागली आहे. आपल्या लूक्सच्या बळावर जुनैद मॉडेलिंग विश्वात कितपत यशस्वी होणार हे येणा-या दिवसांतच कळेल, मात्र सध्या हुबेहुब रणबीरसारखा दिसत असल्यामुळे तो प्रसिद्धीझोतात आला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जुनैद शाहची निवडक छायाचित्रे...