(अभिनेता हृतिक रोशनचे आव्हान पूर्ण करताना रणवीर सिंह)
मुंबईः मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन
आपल्या बॉलिवूडमधील सहकलाकारांना बँग बँग डेअर चॅलेंज देतोय.
प्रियांका चोप्रा आणि
शाहरुख खाननंतर हृतिकचे हे चॅलेंज अभिनेता रणवीर सिंहने स्वीकारले. मुंबईतील कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी आपल्या चाहत्यांमध्ये जाऊन डान्स करण्याचे आव्हान हृतिकने रणवीरला दिले होते.
हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी रणवीर गुरुवारी मुंबईतील लिंक रोड या गर्दीच्या ठिकाणी लक्ष्य या सिनेमातील मैं ऐसा क्यों हूं या गाण्यावर दहा मिनिटे डान्स करताना दिसला. यावेळी तो मस्तीच्या मूडमध्ये दिसला. इतकेच नाही, तर यावेळी त्याने तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचा-यासमोर कान पकडून माफीसुद्धा मागितली. यावेळी रणवीरने क्रिशच्या कॉश्च्युम परिधान केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रणवीर सिंहचा व्हिडिओ...