आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Salman Khan’S Maine Pyaar Kiya Will Re Release On December 2015

Re-Release: 2015मध्ये थिएटरमध्ये पुन्हा चालणार 'मैने प्यार किया'ची जादू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('मैने प्यार किया'मधील विविध छायाचित्रे)
मुंबई- 25 वर्षांपूर्वी सूरज बडजात्या यांच्या 'मैने प्यार किया' सिनेमातून सलमान खानने लव्हर बॉयची इमेज तयार केला होती. त्याच्या या भूमिकेने सर्वांना भूरळ घातली होती. आता बातमी अशी आहे, की त्याच अविस्मरणीय क्षणांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थातच 2015मध्ये हा सिनेमा पुन्हा रिलीज केला जाणार आहे.
इंडस्ट्रीतील सूत्रांच्या सांगण्यानुसार, 2015मध्ये या सिनेमाला 25 वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे एक औचित्य साधून हा सिनेमा पुन्हा एकदा स्क्रिन दाखवला जाणार आहे. निर्माते सिनेमाच्या क्लिअर प्रिंटवर काम करत आहेत. सिनेमाच्या निगडीत काही गोष्टी यावेळी विकण्याची तयारी केली जात आहे. सिनेमा निर्मात्यांना अपेक्षा आहे, की प्रेक्षक या प्रयोगाला प्रतिसाद देतील. जर असे झाले तर सलमानच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो' सिनेमासाठीहा हा प्रयोग फायदेशीर ठरू शकतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'मैने प्यार किया' सिनेमातील काही रंजक छायाचित्रे...