आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Salman Khan's Sister Arpita Will Be Marry In November

पुढील महिन्यात बोहल्यावर चढणार सलमानची लाडकी बहीण अर्पिता, पाहा बॉयफ्रेंडसोबतचे PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत अर्पिता खान)
बॉलिवूड अभिनेता सलमान खानची लाडकी बहीण अर्पिताचे पुढील महिन्यात लग्न आहे. नोव्हेंबर महिन्यात अर्पिता तिचा बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत बोहल्यावर चढणार आहे. खरं तर या दोघांचे पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लग्न होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र खान कुटुंबाशी निगडीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ठरलेल्या वेळेआधी या दोघांचे लग्न लावून देण्याच्या निर्णय दोघांच्याही कुटुंबांनी घेतला आहे.
दोघांचे कुटुंब अलीकडेच डिनरसाठी एकत्र आले होते. त्यावेळी अर्पिता आणि आयुषचे लग्न नोव्हेंबर महिन्यात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अलीकडेच अर्पिता आणि आयुष आपल्या कुटुंबासह शिमल्यात सुटी एन्जॉय करुन पतरले आहेत आणि आता लग्नाच्या तयारीत बिझी झाले आहेत.
सलीम खान यांनी दत्तक घेतले अर्पिताला...
अर्पिता सलीम खान यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. हेलन यांच्यासोबत दुसरे लग्न केल्यानंतर सलीम यांनी अर्पिताला दत्तक घेतले होते. हेलन आणि सलीम खान यांना संतान नसल्यामुळे त्यांनी अर्पिताला दत्तक घेतले. तेव्हापासून ती खान कुटुंबात सामील झाली. खान कुटुंबातील प्रत्येक सदस्य अर्पितावर प्रेम करतात.
विशेषतः सलमान खानची अर्पिता खूप लाडकी आहे. सलमानच्या कोणत्याही इव्हेंटला जाताना अर्पिताला हमखास सोबत नेत असतो. इतकेच नाही तर कोर्ट ट्रायलवेळीसुद्धा अर्पिता सलमानसोबत कोर्टात जाते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बॉयफ्रेंडसोबतची अर्पिताची खास छायाचित्रे...