आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan With His Daughter Suahana Sons AbRam, Aaryan And Wife

हे आहे बॉलिवूडचा King शाहरुख खानचे कुटुंब, पाहा कुटुंबांसोबतची खास छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे, आजोबांसोबत बहीण शहनाज, शाहरुख आणि चुलत बहीण. उजवीकडे शाहरुखचे आईवडील आणि बहीण)

बॉलिवूडचा किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खानचा आज (2 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. 2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्लीत शाहरुखचा जन्म झाला. आज त्याने वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत. शाहरूख हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो.
शाहरुखला फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी आणि येथे आल्यानंतर स्थिरस्थावर होण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला आहे. तो सोळा वर्षांचा असताना कॅन्सरमुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला मोठा धक्का बसला. शाहरुखची आई सतत आजारी राहू लागली आणि तो जेव्हा 25 वर्षांचा झाला तेव्हा, त्याच्या आईनेसुद्धा या जगाचा निरोप घेतला.
शाहरुख खानला एक थोरली बहीण असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. शाहरुखच्या बहिणीचे नाव शहनाज लालारुख आहे. शहनाज आईवडिलांच्या निधनानंतर बरेच दिवस डिप्रेशनमध्ये होती. शाहरुखने आपल्या बहिणीची जबाबदारी सांभाळली आहे. शहनाजला कॅमे-यासमोर येणे मुळीच पसंत नाहीये. पार्टीजमध्ये ती खूप कमी दिसते.
दिल्लीच्या गौरी छिब्बर या तरुणीसोबत शाहरुखने प्रेमविवाह केला. या दाम्पत्याला तीन मुले असून त्यांची नावे आर्यन, सुहाना आणि अबराम अशी आहेत. आर्यन आता 17 वर्षांचा असून लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. तर मुलगी सुहाना 14 वर्षांची आहे. धाकटा मुलगा अबराम आता दीड वर्षांचा असून सरोगसीच्या माध्यमातून त्याचा जन्म झाला आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या आणि शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेल्या 'हॅपी न्यू इयर' या सिनेमात अबराम झळकला आहे.
आज शाहरुखच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्याच्या कुटुंबाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. शाहरुखच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...