आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actori Hrithik Roshan Different Avatars In Movies

\'कहो ना प्यार है\', \'कोई मिल गया\', \'बँग बँग\', पाहा हृतिकचे फिल्मी LOOKS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशनः 'कोई मिल गया', 'बँग बँग' आणि 'कहो ना प्यार है')
मुंबईः पुढील तीन महिने बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्व सुपरस्टार्समध्ये मोठे युद्ध पाहायला मिळणार आहे. याची सुरुवात उद्यापासून अर्थातच 2 ऑक्टोबरपासून होत आहे. बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी हृतिक रोशन आणि कतरिना कैफ स्टारर 'बँग बँग' हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाचा टीजर, प्रोमो आणि साँग लोकांच्या पसंतीस पडले आहेत. सुटीच्या काळात या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळणार अशी आशा व्यक्त केली जात आहे.
'बँग बँग' या सिनेमात हृतिक अॅक्शन हीरोच्या रुपात झळकणार आहे. इतकेच नाही तर त्याने या सिनेमात केलेल स्टंट आजवर कोणत्याही बॉलिवूड हीरोने केलेले नाहीत. तसे पाहता, हृतिक त्याच्या मागील अनेक सिनेमांमध्ये अॅक्शन हीरोच्या रुपात दिसला आहे. मात्र हा सिनेमा त्याला अपवाद ठरणार आहे. कारण या सिनेमात हृतिकचे लूक्स हॉलिवूड स्टार्सप्रमाणे दिसणार आहेत. मोठे केस, चेह-यावर हलकिशी दाढी असा काहिसा लूक त्याचा या सिनेमा असणार आहे. ट्रेलरमधील त्याच्या या लूकला पसंतीची पावती मिळाली आहे.
हृतिक बी टाऊनचा असा एक सुपरस्टार आहे, जो त्याच्या आत्तापर्यंतच्या सर्व सिनेमांमध्ये वेगवेगळ्या रुपात झळकला आहे.
'कहो ना प्यार है' पासून ते 'बँग बँग'पर्यंत...
हृतिकने आपल्या करिअरची सुरुवात 'कहो ना प्यार है' या सिनेमापासून केली होती. या सिनेमातील स्टायलिश लूक आणि डान्सने हृतिक एका रात्रीत सुपरस्टार बनला होता. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. चौदा वर्षांच्या करिअरमध्ये काही फ्लॉप सिनेमांनासुद्धा हृतिकला सामोरे जावे लागले होते. मात्र अॅक्टिंग आणि लूकमुळे तो प्रेक्षकांच्या कसौटीवर खरा उतरला.
'लक्ष्य'मध्ये फौजी बनून तो पडद्यावर अवतरला तर, 'जोधा अकबर'मध्ये अकबरच्या भूमिकेत त्याने जीव ओतला. 'गुजारिश'मध्ये बेयर्ड लूकने त्याने प्रेक्षकांना सरप्राइज केले. 'कोई मिल गया' या सिनेमातील हृतिकचा अवतारसुद्धा प्रेक्षकांना भावला. 'क्रिश'मध्ये मास्क घालून त्याने वाहवाह मिळवली. एकंदरीतच डेब्यू सिनेमापासून ते आगामी 'बँग बँग'पर्यंत हृतिक अनेक लूकमध्ये मोठ्या पडद्यावर झळकला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आत्तापर्यंतचे सिल्व्हर स्क्रिनवर आलेल्या सिनेमातील हृतिकच्या लूकची छायाचित्रे...