आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आइस बकेट चॅलेंज: अक्षयने 11 बकेट बर्फाचे पाणी डोक्यावर ओतून पूर्ण केले आव्हान, आता वेळ सलमानची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Bollywood celebrities ALS Ice Bucket Challenge PART 3 - AKSHAY KUMAR... - Divya Marathi
Bollywood celebrities ALS Ice Bucket Challenge PART 3 - AKSHAY KUMAR...
(Video: 'आइस बकेट चॅलेंज' स्वीकार करताना अक्षय कुमार)

मुंबई: जगभरात धूम घातल्यानंतर 'आइस बकेट चॅलेंज' भारतातही दस्तक देत आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्ससह दिग्गज मंडळींनीदेखील या चॅलेंजला स्वीकारले आहे. आपल्या डोक्यावर बर्फाच्या पाण्याने भरलेल्या बकेट ओतून या चॅलेंजला स्वीकारले आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आइस बकेट चॅलेंजला स्वीकार करण्याऐवजी डोनेट करण्यास सांगितले आहे.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या चॅलेंजला स्वीकारत अक्षय कुमारने स्वत:च्या अंगावर बर्फाच्या पाण्याने भरलेल्या 11 बकेट ओतून चॅलेंजला पूर्ण केले आहे. अक्षयने हे चॅलेंज पूर्ण केले मात्र त्वरीत त्याने हे चॅलेंज सलमान खान आणि जॉनी लिव्हर यांच्याकडे पाठवले. आता सलमान हे चॅलेंज 24 तासांच्या आत पूर्ण करतो की नाही हे बघणे रंजक ठरणार आहे. तसेच गायक दलेर मेहंदी यांनीसुध्दा चॅलेंज पूर्ण करून प्रियांका चोप्रा, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना चॅलेंज दिले आहे.
भारतात या चॅलेंजला स्वीकारणा-यांमध्ये सानिया मिर्झाने टेनिस खेळाडू महेश भूपती, रितेश देशमुख, क्रिकेटर युवराज सिंह आणि बहीण अनम मिर्झा यांचे नाव घेतले. त्यामध्ये रितेश देशमुखने एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हे चॅलेंज स्वीकारले. बर्फाच्या पाण्याने भरलेली बकेट त्यांने आपल्या डोक्यावर ओतली आणि चॅलेंज स्वीकारले. त्यानंतर त्याने अभिषेक बच्चन, अक्षय कुमार, सिध्दार्थ मल्होत्रा, पुलकित सम्राट आणि आशीष चौधरी यांना हे चॅलेंज दिले.
अभिषेक बच्चनने घरातील बाथटबमध्ये उभा राहून डोक्यावर बर्फाचे पाणी ओतून चॅलेंज स्वीकारल्याचा व्हिडिओ अपलोड केला. अभिषेकव्यतिरिक्त अक्षय कुमार आणि पुलकित सम्राटनेसुध्दा टि्वटरवर या चॅलेंजला स्वीकारले आहे. एका मित्राच्या म्हणण्यावर बिपाशा बसुनेसुध्दा या चॅलेंजचा स्वीकार करून व्हिडिओ अपलोड केला आहे. स्वत: या चॅलेंजचा स्वीकार करून तिने शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांनाही हे आव्हान स्वीकारण्यास सांगितले आहे.
काय आहे आइस बकेट चॅलेंज ?
बर्फांच्या बादलीभर पाण्याने आपण आंघोळ करायची आणि 24 तासांच्या आत इतर तीन जणांना आंघोळीसाठी तयार करायचे. जर आंघोळ करणारे तीन जण तयार झाले नाहीत तर आपण 'न्यूरोडिजेनेरेटिव डिसऑर्डर' शी झुंज देणा-या रुग्णांच्या मदतीसाठी काम करणा-या सेवाभावी संस्थेला 100 अमेरिकी डॉलर दान म्हणून द्यायचे.
काय आहे खरी परिस्थिती ?
खरे तर 'न्यूरोडिजेनेरेटिव डिसऑर्डर' हा आजार मस्तिष्कांशी जोडला गेला आहे. त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या आजारामुळे अमेरिकेत प्रत्येक 90 मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे. हा आजार प्रामुख्याने 40 ते 70 या वयोगटातील मनुष्यांना उद्भवतो.
येथून सुरु झाली चॅलेंजची सुरवात
अमेरिकेचा बेसबॉल खेळाडू आणि एमियोट्रॉफिक लेट्रल स्केलेरॉसिस यांनी न्यूरोडिजेनेरेटिव रोगाने पछाडलेल्या पीट फ्रेट्सचा व्हिडिओ सोशल साइटवर अपलोड केला होता. तेव्हापासून आइस बकेट चॅलेंजची सुरुवात झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काही प्रसिध्द स्टार्स स्वीकारलेल्या आइस बकेट चॅलेंजचे व्हिडिओ...