आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिव्ह-इन, मुलीचा जन्म आणि नंतर लग्न, अशी होती कमल हासन-सारिकाची Love Story

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कमल हासन आणि सारिका यांच्या लग्नाची छायाचित्रे)
दाक्षिणात्य सुपरस्टार आणि बॉलिवूडमध्येसुद्धा आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे अभिनेते
कमल हासन यांनी आज वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहेत. 7 नोव्हेंबर 1954 मध्ये तामिळनाडू येथील परमाकुदी येथे त्यांचा जन्म झाला. कमल हासन यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये आत्तापर्यंत चार राष्ट्रीय पुरस्कार आणि 19 फिल्मफेअर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.
वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी बालकलाकाराच्या रुपात आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी दाक्षिणात्य अभिनेत्री वाणी गणपतीसोबत लग्न केले. मात्र केवळ दहा वर्षेच त्यांचे नाते टिकले. घटस्फोटानंतर कमल यांच्या आयुष्यात अभिनेत्री सारिकाची एन्ट्री झाली.
पहिले बाळाचा जन्म आणि नंतर लग्न...
कमल हासन आणि सारिका इंडस्ट्रीतील बोल्ड कपल्सपैकी एक आहेत. त्यांनी ऐंशीच्या दशकात केवळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे धाडसच दाखवले नव्हेत, तर त्यांच्या पहिल्या मुलीचा जन्मसुद्धा लग्नापूर्वीच झाला. त्यांची थोरली मुलगी श्रुतीचा जन्म 1986मध्ये झाला आणि तिच्या जन्माच्या दोन वर्षांनी म्हणजे 1988मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र 2002 मध्ये त्यांचे नाते संपुष्टात आले. सारिकाचे पहिले तर कमल हासन यांचे हे दुसरे लग्न होते. सध्या कमल अभिनेत्री गौतमीसोबत लिव्ह इन (2005 पासून) मध्ये राहात आहेत.
कमल आणि सारिका यांचे नाते 17 वर्षे टिकले. कमल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की हे नाते फार काळ टिकणार नाही, याचा अनुभव त्यांना फार पूर्वीच आला होता. मात्र दोन्ही मुलींसाठी त्यांना सारिकासोबत राहावे लागले. श्रुती आणि अक्षरा मोठ्या झाल्यानंतर त्यांनी सारिकापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
तसे पाहता आजच्या काळात तर बॉलिवूडमध्ये लिव्ह-इनमध्ये राहणे कल्चर बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता तर काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर ब-याच सेलेब्सनी आपले नाते संपुष्टात आणले. तर काहींनी काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर लग्न केले.
आज आम्ही तुम्हाला लिव्ह-इनमध्ये राहणा-या आणि पूर्वी राहत असलेल्या बी टाऊनच्या स्टार्सबद्दल सांगतोय. जाणून घ्या कोणकोणते स्टार्स लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा होते...