आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोर यांचे नाव होते आभास, तर गोविंदाचे होते गोविंद, जाणून घ्या स्टार्सचे Real Names

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - किशोर कुमार आणि गोविंदा)
अनेक अभिनेता-अभिनेत्रींनी आपले नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशाच नावांपैकी एक नाव म्हणजे किशोर कुमार. किशोर दांची 4 ऑगस्ट रोजी 85वी जयंती होती. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील खंडवा येथे झाला होता. त्यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली असे होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी आपले नाव बदलून किशोर कुमार ठेवले. कोरस सिंगरच्या रुपात त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पुढे अभिनयातसुद्धा त्यांनी आपले नशीब आजमावले होते.
अशोक कुमार होते मोठे भाऊ...
चार बहिणभावंडांमध्ये किशोर दा सर्वात लहान होते. किशोर दा लहान असतानाच अशोक कुमार बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते बनले होते. त्यांना पाहून त्यांचे छोटे भाऊ अनूप कुमार आणि किशोर कुमार यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा विचार केला होता.
मधुबाला होती दुसरी पत्नी...
किशोर कुमार यांनी आपल्या आयुष्यात एकुण चार वेळा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न बंगाली गायिका आणि अभिनेत्री रुमा घोषसोबत झाले होते. 1950 ते 1958 त्यांचे लग्न टिकले. या दोघांना एक मुलगा आहे. त्याचे नाव अमित कुमार असे आहे. मधुबालासोबत किशोर दांनी दुसरे लग्न केले. मधुबाला यांच्या निधनापर्यंत म्हणजे 23 फेब्रुवारी 1969 ते त्यांच्यासोबत होते. योगिता बाली किशोर दांच्या तिस-या पत्नी. 1976 ते 1978 पर्यंत म्हणजे फक्त दोन वर्षे त्यांचा संसार टिकला. किशोर दांच्या वाढदिवशीच ते दोघे विभक्त झाले. त्यानंतर 1980 मध्ये किशोर दांनी अभिनेत्री लीना चंद्रावरकरची आपल्या जोडीदाराच्या रुपात निवड केली. किशोर दांच्या निधनापर्यंत (13 ऑक्टोबर 1987) लीना त्यांच्यासोबत होत्या.
किशोर दांची गाजलेली गाणी...
किशोर दांनी अनेक गाणी आजही सदाबहार आहेत. यामध्ये 'मेरे सपनों की रानी', 'ये जो मोहब्बत है', 'कुछ तो लोग कहेंगे', 'ईना-मीना-डीका', 'फूलों के रंग से जाने जां ढूंढता फिर रहा', 'रूप तेरा मस्ताना'... या प्रमुख गाण्यांचा समावेश आहे.
बॉलिवूडमध्ये किशोर कुमार यांच्यापासून ते गोविंदा, अजय देवगण, अक्षय कुमार, प्रिती झिंटासह अनेक अशा अनेक अभिनेता-अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे, ज्यांनी आपले नाव बदलले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या काही स्टार्सविषयी, ज्यापैकी काहींनी आपले नाव तर काहींनी आडनाव बदलले आहे.