आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा 23 वर्षांत किती बदलला अजय, करीना-शिल्पामध्येही झालाय कमालीचा बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अजय देवगण पूर्वी आणि आता)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या लूक्ससाठी प्लास्टिक सर्जरीचा वापर करतात. मात्र काही अभिनेत्यांच्या लूक्समध्ये नैसर्गिक बदल झालेले देखील तुम्ही पाहिले असेल. अजय देवगणसुध्दा त्या अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच रिलीज झालेल्या 'सिंघम रिटर्न्स'मध्ये त्याच्या लूकमध्ये पूर्वीपेक्षा खूप बदल झालेला दिसून येतो.
अजयमध्ये त्याच्या पहिल्या 'फुल और कांटे'पासून ते 'सिंघम रिटर्न्स'पर्यंत किती बदल पाहायला मिळाला आहे. करिअरच्या सुरुवातीला अजय खूप सडपातळ होता. आता अजय 45व्या वर्षी फिट बॉडीसह रुपेरी पडद्यावर झळकतो. असाच बदल सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातही पाहायला मिळतो. सलमान त्याच्या जून्या सिनेमांमध्ये खूप सडपातळ होता. मात्र आता तरुण मुले त्याच्या फिट बॉडीची कॉपी करण्याचा मागे लागलेले असतात.
दुसरीकडे, बॉलिवूड अभिनेत्रींकडे पाहिले तर त्यांच्यातही बराच बदल झालेला दिसून येतो. मात्र त्या लूक्स बदलण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा वापर करतात असे म्हटले जाते. श्रीदेवी आणि शिल्पा शेट्टी याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. दोघींनी नाकावर प्लास्टिक सर्जरी केली आहे. शिवाय, काही बॉलिवूड अभिनेत्रींनी बॉलिवूड करिअरसाठी किलोने वजन कमी केले आहे. या स्टार्समध्ये अर्जुन कपूर, सोनम कपूर, करीना कपूर आणि सोनाक्षी सिन्हासारख्या सेलेब्सचा सामावेश आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून छायाचित्रांमध्ये पाहा काळानुसार कसे बदलत गेले तुमचे आवडते बॉलिवूड स्टार्स...