आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actors Hairstyles We Saw In The Movies

'एन्टरटेन्मेंट'मध्ये दिसेल अक्षयचा नवीन लूक, पाहा स्टार्सच्या हटके Hairstyles

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वेगवेगळ्या हेअरस्टाइलमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि सलमान खान)
मुंबई - अक्षय कुमार स्टारर 'एन्टरटेन्मेंट' हा सिनेमा आज सिल्व्हर स्क्रिनवर रिलीज झाला आहे. या सिनेमात त्याच्यासह अभिनेत्री तमन्ना भाटिया झळकणार आहे. यावर्षी रिलीज होणारा अक्षयचा हा दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी त्याचा 'हॉलिडे' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला कौल मिळाला होता. आता 'एन्टरटेन्मेंट' या सिनेमाकडून त्याला भरपूर अपेक्षा आहेत.
शीर्षकाप्रमाणे सिनेमा प्रेक्षकांना एन्टरटेन करेल, अशी आशा आहे. या सिनेमात अक्षय वेगळ्या हेअरस्टाइलमध्ये झळकणार आहे. 'जॉनी जॉनी' या गाण्यात त्याचा हा नवा अंदाज दिसतोय. त्याची ही स्टाइल त्याच्या मागील सिनेमांपेक्षा वेगळी आहे.
तसे पाहता बॉलिवूडमध्ये हीरो आपल्या सिनेमांनुसार आपली हेअरस्टाइल बदलताना दिसतात. त्यांची ही स्टाइल त्यांच्या चाहत्यांसाठी फॅशन बनते. देव साहेबांपासून ते संजय दत्त, सलमान खान, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, आमिर खानसह बरेच स्टार्स सिनेमांमध्ये वेगवेगळ्या हेअरस्टाइलमध्ये झळकले आहेत. जाणून घेऊया या स्टार्सविषयी...
सलमान खान...
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान 'तेरे नाम' या सिनेमात नवीन लूकमध्ये झळकला होता. त्याची ही स्टाइल एवढी लोकप्रिय झाली होती, की त्याचे चाहते हमखास अशा हेअरस्टाइलमध्ये दिसत होते. या हेअरस्टाइलला 'तेरे नाम' हे नाव देण्यात आले होते.
इतर स्टार्सच्या हेअरस्टाइलचा लूक बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...