विविध कारणांमुळे प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चर्चेत असेलेली अभिनेत्री
राखी सावंत ही तिच्या मैत्रिणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीची मैत्रिण मनिषा कुमारी हिने 'मुंबई कॅन डान्स' या आगामी सिनेमाच्या म्यूझिक लॉन्चच्या पार्टीमध्ये स्टेजवर जाऊन दिग्दर्शक सचिन्द्र शर्मा यांच्या कानशीलात लगावली. तिने या दिग्दर्शकावर कास्टिंग काऊचचा आरोप लावला आहे.
या प्रकरणानंतर पार्टीत एकच खळबळ उडाली. मनिषाने दिग्दर्शक शर्मा यांच्या विरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार केली. मनिषा कुमारी ही मूळची दिल्ली येथील आहे. दोन वर्षांपासून ती मुंबईमध्ये राहते. सिनेमात काम मिळावे, यासाठी तिने शर्मा यांच्याजवळ मदत मागितली होती. म्युझिक लॉन्चच्या पार्टीदरम्यान शर्माने
आपली छेड काढली. त्यामुळे रागामध्ये हा प्रकार घडला असे मनिषाने सांगितले.
तसे पाहता, एखाद्या दिग्दर्शकावर कास्टिंग काऊच किंवा छेडछाडीचा आरोप असल्याची ही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये शक्ति कपूरपासून ते मधुर भंडारकर या मोठ्या नावांचा समावेश आहे.
परिधी शर्माने लावला होता दिग्दर्शकावर आरोप...
यावर्षी मार्चमध्ये बातमी आली होती की, टिव्हीवरची प्रसिद्ध मालिका 'जोधा अकबर'चा दिग्दर्शक संतराम वर्माने जोधा उर्फ परिधी शर्माची सेक्शुअल हरॅसमेंटल केली होती. या प्रकाराला कंटाळून तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे अशाही बातम्या आल्या होत्या. याबद्दल तिने मीडियाला काही सांगण्यास नकार दिला होता, तसेच संतरामनेदेखील मौन पाळले होते. काही दिवसांपुर्वी संतरामने या आरोपांना खोटे ठरवले.
मधुर भंडारकर, शायनी आहुजापासून ते आदित्य पंचोलीपर्यंत अनेक स्टार्स लैंगिक शोषणच्या प्रकरणात अडकले आहेत. एक नजर टाकुया अशाच काही प्रकरणांवर...