आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख, आमिरपासून ते सलमानपर्यंत, बदलत गेला या सुपरस्टार्सचा चेहरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रुपेरी पडद्यावर बॉलिवूड अभिनेत्यांचे बदलले रुप प्रेक्षकांना बघायला मिळत असते. बी टाऊनमधील खान मंडळी असो, बच्चन कुटुंब असो किंवा कपूर कुटुंब, पटकथेच्या गरजेनुसार कलाकार आपला गेटअप बदलत असतात. 'माय नेम इज खान' या सिनेमात शाहरुख खान, 'गजनी'मध्ये आमिर खान, 'पा'मध्ये अमिताभ बच्चन, 'कोई मिल गया'मध्ये हृतिक रोशन, बदललेल्या रुपात पडद्यावर अवतरले होते.
भूमिकेच्या गरजेनुसार अभिनेत्यांना आपला लूक बदलावा लागतो. मात्र वयानुसारसुद्धा या कलाकारांच्या रुपात झालेला बदल पाहायला मिळतो. या अभिनेत्यांनी जेव्हा आपल्या करिअरला सुरुवात केली तेव्हापासून ते आत्तापर्यंत या अभिनेत्यांच्या चेह-यात कमालीचा बदल झाला आहे.
अलीकडेच आयपीएल 7च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा बदलेल्या रुपात समोर आला. या सेरेमनीत शाहरुख लांब केसात दिसला. त्याने केसांना कलर केले होते. किंग खानचा हा लूक चांगला दिसत होता.
शाहरुखला या फिल्मी इंडस्ट्रीत काम करुन जवळजवळ 26 वर्षे झाली आहेत. 1988 मध्ये शाहरुखने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली. 'फौजी' या मालिकेत तो झळकला होता. तर 1992मध्ये 'दीवाना' या सिनेमाद्वारे त्याने मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत शाहरुखच्या लूकमध्ये कमालीचा फरक पडला आहे. वरील छायाचित्रात शाहरुखमध्ये झालेला बदल स्पष्ट दिसून येतोय.
तसे पाहता, बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्या चेह-यात बदल झालेला दिसून येतो. मग तो आमिर असो, सलमान असो, सैफ असो किंवा अनिल कपूर. या स्टार्सचा चेहरा करिअरला सुरुवात केल्यापासून ते आत्तापर्यंत बराच बदलला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कोणकोणत्या अभिनेत्याच्या चेह-यात दिसून आला आहे बदल...