आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bollywood Actors Who Married Not So Famous Girls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवेकपासून ते अनिलपर्यंत, अभिनेत्रींनी नव्हे तर या सामान्य तरुणींनी जिंकले या स्टार्सचे हृदय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- विवेक ओबरॉय-प्रियांका अल्वा (L) आणि अनिल कपूर-सुनीता कपूर)
मुंबई - प्रेम कधीही कुणावरही जडू शकतं. परिस्थिती किंवा नियम बघून प्रेम होत नाही. सामान्यांपासून ते मोठमोठे सेलिब्रिटी प्रेमात पडताना दिसतात. बॉलिवूडविषयी बोलायचे झाल्यास येथे असे अनेक स्टार्स आहेत जे येथील अभिनेत्रींशी लग्नबेडीत अडकले. मात्र काही स्टार्स असे आहेत, ज्यांना बॉलिवूड अभिनेत्री नव्हे तर सामान्य तरुणी भावल्या.
असाच एक अभिनेता म्हणजे विवेक ओबरॉय. विवेक आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. ऐश्वर्या रायसोबतचे अफेअर असो, किंवा सलमान खानसोबत घेतलेला पंगा, यामुळे चर्चेत राहिलेल्या विवेकने आपल्या जोडीदाराच्या रुपात एका नॉन फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्या तरुणीची निवड केली.
2010 मध्ये विवेकने प्रियांका अल्वासोबत लग्न केले. या दोघांना 2013मध्ये पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. विवेकविषयी त्याच्या चाहत्यांना ठाऊक आहे, मात्र त्याच्या पत्नीविषयी फार कमी जणांना ठाऊक आहे. प्रियांका कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी आहे. लग्नानंतर प्रियांका अनेक ठिकाणी विवेकसह दिसली आहे.
तसं पाहता विवेक पहिला असा बॉलिवूड स्टार नाहीये, ज्याने फिल्मी दुनियेशी संबंधित नव्हे तर दुस-या फिल्डमधील तरुणीशी लग्न थाटले. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच जोड्यांविषयी सांगतोय, ज्यापैकी एक पार्टनर स्टार आहे तर दुस-याचा कॅमे-याशी काहीही संबंध नाहीये...
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच काही जोड्यांविषयी...