आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रमा माधव\'मधील अदिती राव हैदरी आहे आमिरची मेव्हणी, जाणून घ्या तिच्याविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता आमिर खान)
हिंदीत काही मोजक्या सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री अदिती राव हैदरी आज रिलीज झालेल्या 'रमा माधव' या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित सिनेमात झळकली आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' या सिनेमाद्वारे अदितीने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. पारंपरिक पोषाख आणि अंगभर दागिन्यांमध्ये ती या सिनेमात मुजरा सादर करताना दिसत आहे.
'लूट लियो मोहे शाम सावरे बरबात जमुना किनारे' असे बोल असलेल्या या मुज-यात अदितीच्या दिलखेचक अदा प्रेक्षकांना घायाळ करणा-या आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी आदितीवरील गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.
भरतनाट्यम नृत्‍यांगना असलेली अदिती बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मेव्हणी असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? होय, अदिती आणि आमिर खान नातेवाईक आहेत. अदिती, आमिरची दुसरी पत्नी किरण रावची सख्खी मामेबहीण आहे. किरण आणि अदितीमधले बॉडिंग खूप चांगले आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अदितीच्या खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत... पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अदितीविषयी आणि पाहा तिची ग्लॅमरस छायाचित्रे...