आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Aish And Other Celebs Stay In Grand Hyatt Cannes Hotel Martinez

Cannesमध्ये बच्चन बहूचा शाही थाट, हॉटेलचे एका दिवसाचे भाडे तब्बल 22 लाख रुपये, PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्समध्ये सध्या 67वा कान फिल्म फेस्टिव्हल सुरु आहे. या फेस्टिव्हलमध्ये बच्चन बहू अर्थातच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दरवर्षी हजेरी लावते. या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे ऐश्वर्याचे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे. खरं तर ऐश्वर्या 16 मे रोजी कानच्या रेड कार्पेटवर अवतरणार होती. मात्र वेळेत कानमध्ये पोहोचू न शकल्यामुळे 20 मे रोजी ऐश्वर्याचे दर्शन तिच्या चाहत्यांना कानच्या रेड कार्पेटवर घडले. यावेळी रॉबर्टा कॅव्हॅलीच्या गोल्डन गाऊनमध्ये ऐश्वर्या भाव खाऊन गेली. शिवाय दुस-या दिवशीसुद्धा कॅव्हॅली सिल्व्हर गाऊनमध्ये तिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
अर्थातच कानच्या रेड कार्पेटवरील ऐश्वर्याचा थाट डोळे दिपवणारा होता. यावर्षी ऐश्वर्याची लाडकी लेक आराध्या, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य रायसुद्धा तिच्यासह फ्रान्सला गेले आहेत. येथे ते कोणत्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून देत आहोत.
हॉटेल मार्टीनझ -
ऐश्वर्या कानमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे, ते एखाद्या शाही महलापेक्षा कमी नाहीये. हॉटेल ग्रॅण्ड हयातच्या चेनमधील हॉटेल मार्टीनझ येथे ऐश्वर्या सध्या वास्तव्याला आहे. विशेष म्हणजे या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे तब्बल 22 लाख रुपये आहे. यावरुन हे हॉटेल किती आलिशान असणार याचा तुम्ही अंदाज बांधू शकता.
या हॉटेलची स्थापना 20 फेब्रुवारी 1929 रोजी इमॅन्युएल मिशेल मार्टीनझ यांनी केली होती. दुस-या महायुद्धादरम्यान जर्मन लष्कर, इटालियन लष्कर, फ्रेंच आर्मी, जर्मन आर्मी यांनी एकामागून एक त्यावर ताबा मिळवला. लिबरेशननंतर युएसए हवाई दलाकडे हॉटेलचा ताबा आला.
2012मध्ये हे हॉटेल ग्रॅण्ड हयात चेनने विकत घेतले आणि 9 एप्रिल 2013 रोजी या हॉटेलचे नामांकरण ग्रॅण्ड हयात कान्स हॉटेल मार्टीनझ असे करण्यात आले.
या हॉटेलमध्ये एकुण 409 रुम आणि सुट्स आहेत. तर तीन रेस्तराँ, एक पियानो बार, एक खासगी समुद्र किनारा, स्विमिंग पूल, 15 मिटींग रुम्स आणि 2500 स्के. मिटरचा स्वागत लाउंज आहे. कानमध्ये सहभागी होणारे सेलिब्रिटी या हॉटेलमध्ये वास्तव्याला असतात. शिवाय सेमिनार, उत्सव, प्रोफेशनल इवेंट्स येथे आयोजित केले जातात.
L.RAPHAEL ब्युटी स्पा हॉटेलच्या सातव्या माळ्यावर आहे. 2009मध्ये फोर्ब्स मॅगझिनने या हॉटेलमधील सुट्स जगातील सर्वाधिक महागडे सुट्स म्हणून जाहीर केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या महागड्या हॉटेलची खास झलक...