आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमधून अचानक गायब झालेल्या अमृता रावने गुपचुप थाटले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 2015 या वर्षात बॉलिवूडमध्ये सर्वात पहिले लग्न सोहा अली खान आणि कुणाल खेमूचे झाले. दोघांच्या लग्नानंतर अभिनेत्री अमृता रावनेसुध्दा लग्न केल्या बातम्यांना उधाण आले आहे. बॉयफ्रेंड अनमोलसोबत अमृता लग्नगाठीत अडकल्याचे सांगितले जात आहे. आपल्या नात्याला माध्यमांपासून नेहमी दूर ठेवणा-या अमृता आणि अनमोलने मुंबईमध्ये लग्न केले आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'दोघांनी काही महिन्यांपूर्वी लग्न केले आणि वकोलामध्ये राहत आहेत. हे घर अनमोलच्या कुटुंबीयांच्या घराजवळच आहे. अमृता यापूर्वी आपल्या कुटुंबीयांसोबत वर्सोवामध्ये राहत होती.'
अनमोल रेडिओ क्षेत्रातील प्रसिध्द नाव असून तो सध्या एका स्पोर्ट चॅनलसाठी शो करत आहे. अमृता 2013मध्ये 'सत्याग्रह' आणि 'सिंह साहब द ग्रेट' सिनेमांत झळकली होती. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'अमृता आता वकोलामध्ये आपल्या नवीन घरातच प्रोफेशन मीटींग करते.
अमृताची बहीण प्रीतिका राव 'बेइंतहा' मालिकेत काम करत आहे. बहिणीनंतर आपणही टीव्हीत काम करावे अशी अमृताची इच्छा आहे. कारण बॉलिवूडमध्ये अमृताचे करिअर थांबले आहे.'
काही दिवसांपूर्वी अमृता एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती, त्यावेळी तिच्या हातात साखरपुड्याची अंगठी दिसली होती. त्यानंतर अंदाज व्यक्त केले जातत होते, की तिने आपला साखरपुडा उरकला आहे.