आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Anushka Sharma Denies Wedding Plans With Cricketer Virat Kohli

विराटसोबत लवकर लग्न करण्यास अनुष्काने दिला नकार, म्हणाली- अफवांवर विश्वास ठेऊ नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा
नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या लग्नाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अनुष्का - विराट यांच्या लग्नाच्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे तिच्या एका प्रवक्त्याने सांगितले आहे. लंडनमध्ये तिला विराटसोबत राहाण्याची परवानगी मिळावी यासाठी बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने ते लवकरच लग्न करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चेने जोर धरला होता.
लग्नाच्या बातम्यां निव्वळ अफवा

अनुष्काच्या प्रवक्ताने सांगितले, 'विराट आणि अनुष्काचे लग्न होणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, त्यात कोणतीही सत्यता नाही. त्या केवळ अफवा आहेत. तुम्ही देखील अफवांपासून दूर राहावे. आणि अशा अफवा पसरवू नये.'

अशी सुरु झाली लग्नाची चर्चा

विराट आणि अनुष्का यांच्या अफेअरच्या बातम्या अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र बघितल्या गेले आहे. अनुष्काला लंडनमध्ये विरोटसोबत एकाच हॉटेलमध्ये राहता यावे यासाठी बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने, दोघे लवकरच लग्नगाठीत अडकणार आहेत असे सांगून परवानगी दिली.

टीम इंडिया लंडनमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्याच हॉटेलमध्ये अनुष्काला थांबण्याची परवानगी दिल्याने भारतीय संघ व्यवस्थापकसुद्धा आश्चर्यचकित झाले होते. त्यांना बीसीसीआयच्या 'त्या' अधिकार्‍याने चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगत, ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यासोबतच असे काही पहिल्यांदा होत आहे, असेही नाही. यापूर्वी देखील एक कर्णधार परदेश दौर्‍यावर गर्लफ्रेंडला घेऊन गेला होता. असा दावा त्या अधिकार्‍याने केला होता.
'भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्याच हॉटेलमध्ये अनुष्का राहात असल्याचे माध्यमांना कळाले तर?', ही चिंता व्यवस्थापकाला होती. पण बीसीसीआयच्या त्या अधिकार्‍याला कोहलीवर विश्वास होता. तो माध्यमांना सांभाळून घेईल. कोणतीही चर्चा होऊ देणार नाही, असे त्या अधिकार्‍याने व्यवस्थापनाला स्पष्ट केले होते.